मी एकदा ठाणे इंडस्ट्रीअल विंग या संस्थेतर्फे एक सहलीकरिता जात होतो. सर्व सभासद मिळून दोन खासगी बस तयार केली. त्यावेळेस माळशेज घाट हा फार प्रसिद्ध होता. आम्ही ठाणे, कल्याण मुरबाडने थेट माळशेज मार्गानी जुन्नरपर्यंत जावयाचे ठरले होते. त्याप्रमाणे सकाळी ५ ते ६ ।। वाजता आम्ही निघालो होतो. ठाणे, कल्याण, मुरबाड करीत आम्ही माळशेज घाटाला जाता जाता खूप बस अत्यंत धीम्या गतीने जात होती. आणि शेवटी थांबली. चालक खाली उतरून म्हणाला की, मध्ये एक मोठी दरड कोसळली आहे त्यामुळे कमीत कमी चार तास लागणारच. सकाळचे साधारण साडेदहा वाजून गेले होते. आम्ही खाली उतरलो तेव्हा आम्ही दोघे मिळून काही खेडेगांव दिसते का. हे बघण्याकरिता गेलो होतो. जाता जाता साधारण एक किलोमीटर आम्हाला एक खेडे दिसले. अगदी एकच झोपडी होती. आम्ही जवळ आलो तर एक कुडाची झोपडी दिसली. आत डोकावले तर खोली साधारण दहा बाय दहा आकाराची होती व सुंभाच्या दोरीने कपडे अस्ताव्यस्त ठेवले होते. पुढे गेल्यावर एक माता स्तनपान करीत आपल्या बाळाजवळ बसली होती. थोडे पुढे गेल्यावर आमच्या जवळ दहा बारा मुले व मुली सर्वाकडे बघत होती. सर्व मुले व मुली साधारण तीन ते चार पाच वर्षांचीच होती सर्वांची पोट फुगलेले व नाकाला शेंबूड होता. आम्हाला पाहून सर्व मुले बघत पळून गेली. जरा जवळ गेलो तर अंगणवाडी ही पाटी दिसली. विशेष म्हणजे गावात कोणीतरी साहेब आले आहेत अशी बातमी पसरली. इतक्यात कोणीतरी आले. सर्व मुली उभ्या राहिल्या व नमस्ते गुरुजी आणि आम्हाला हाळी दिली. आम्ही पण त्यांना नमस्ते केले. नमस्कार केला व बसावयास सांगितले. वर्गशिक्षिका एक बाई होती. आपण सरकारी नोकर का?
नाही साहेब. ठाण्याहून सहलीकरिता निघालो व बस अडकल्याने निघालो. परवानगी असल्यास आम्हाला शाळा बघावयाची आहे. सर्व वर्गशिक्षिका बाहेर आल्यावर आम्ही स्वयंपाक घरात गेलो. स्वयंपाक थोडा अंधार होता व दोन खोके भरलेले होते. एकात एक पटणीचे बारीक कण्या होत्या व दुसरे भरडलेले मुगाची डाळ होती. त्याला कुबट असा वास येत होता. वर्गशिक्षिका म्हणाल्या, या आमच्या खिचडी, कण्या व मुगाची डाळ पाखडून एकत्र करून त्याची खिचडी बनवतो. त्यात थोडी हळद व मीठ बरोबर होते. आम्ही विचार केला की, ही जर खिचडी तर जनावरे सुद्धा खाणार नाहीत. तेवढ्यात एकजण मळकट लेंगा व नेहरू पैरण घालून बाहेर आले. ‘हे आमचे ग्रामसेवक’ शिक्षिकेने ओळख करून दिली. वास्तविक अंगणवाडीला बरेच मोठे अंगण होते. मी ग्रामसेवकाला विचारले की, तुम्ही वृक्षारोपण करता की, नाही तो म्हणतो की, कधी कधी मुरबाड येथून रोपे येतात. पण सर्व जनावरे खावून टाकतात. मी काहीच बोललो नाही.
समोरूनच हा पिण्याचा हौद होता साधारण चार बाय सहाचा अंदाजे असावा व साधारण दोन ते अडीच फूट खोल होता. सर्व बायका गप्पा मारीत धुणी धुत होत्या. तेवढ्यात चार पाच गायी, म्हशी, पाणी पिण्यास येत होत्या. काही बायका रिकामी भांडी घेऊन पाणी भरण्याकरिता निघून गेल्या. इतक्यात एक पांढरा स्वच्छ परीट घडीचा लेंगा व पैरण व वर गांधी टोपी भेटला. रामराम पाव्हणं, तुम्ही मुंबईचे की काय? नाही आम्ही सहज माळशेज घाटाकरिता आलो होतो. वर्गशिक्षिकेने सांगितले हे आमचे सरपंच. आम्ही परत बाहेर पडलो. समोरच एक प्राथमिक आरोग्य केंद्र अशी पाटी दिसली. दाराला फक्त कुलूप होते. आम्ही विचारले की, डॉक्टर नेहमी येतात का? त्या म्हणाल्या नाही. पण एक डॉक्टर बाई तीन चार दिवसांनी एकदा येतात. मग कोणी आजारी पडला तर? मग शेजारी एखादा डॉक्टर असला तर आम्ही गावाजवळच जातो. पण येथे रुग्णवाहिकेचे काहीच सोय नाही. निदान तीन चार गावाना मिळून जर एक रुग्णवाहिका असल्यास आजारी माणसाला त्याची जास्त गरज असते. आम्ही परत जाताना एक विचार मनामध्ये घोळत होता. आम्हाला भेटलेली दहा बारा मुले तसेच पाठीमागची मिळून पाच पन्नास मुले ही मोठी होतील, कोठेही उद्योग काहीच नाही. फक्त थोडीशी शेती करणे व बाकीचे सर्व चकाट्या पिटतात. ही मुले मोठी झाली. आज अठरा ते वीस मुले वयात येतील.
त्यांची लग्ने होतील म्हणजे मोठी मुले होतील. इथे फॅमिली प्लॅनिंग वगैरे काहीच नाही.
कधी काळी फॅमिली प्लॅनिंग जोरात होती. त्यांच्या गाड्या फिरत होत्या. काही लोक पुरुष अथवा स्त्रियांना मन वळवून इकडे आणण्याचे प्रयत्न करीत असत व एजंटांना त्यांचे पैसे मिळत असत. आता सर्व बासनात झाले. ही फारच गंभीर बाब आहे. अनेक मुले व मुलीसारखी खेळत असतात. कोणतेही काम जवळ पास नाही. पैसे मिळविण्याचे काही साधनही नाही. माणसांनी विचार केला नाही तो अधिक अविचारी होतो. ही सर्व सरकारची जबाबदारी आहे. ही मुले काहीही करू शकतात. लहान मुलामुलींवर बलात्कार करणार. या मुलांचे गावात पोलीस पाटीलही कधीच नव्हते. ग्रामसेवक काय करणार? शहर तालुक्यापेक्षाही हा प्रकार फार गंभीर आहे. आणि सरकारने परत फॅमिली प्लॅनिग सुरू करणे अगत्याचे आहे. काही रोजगार हमी योजना हा लोकांचा कामाला लावण्याचा उपयोग नाही. चार मुले व मुली चार काम करून काही पैसे मिळविणे शक्य आहे पण तसे कोठेच काहीच नाही. महाराष्ट्रातले मुख्य प्रधान पृथ्वीराज चव्हाण हे पृथ्वीचे राज आहेत. त्यांच्या आपल्या प्रधान मंत्र्यांवर चार पाच वर्षांचा अनुभव आहे. तसे ते कुशल प्रशासक आहेत. त्यांना हे काम अवश्य मनावर घेतले तरच ते होईल. चव्हाणसाहेब मनावर घेतील अशी आशा आहे. आपल्या कायदा फार मवाळ आहे. सामुहिक बलात्कार झाला तर अशा माणसाला कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. आता हा विषय एवढेच नाही तर अनेक गुन्हेगार या वर्गात मोडतात. फॅमिली प्लॅनिंग सेंटर परत उघडा. हे वीज पाणीपेक्षाही गंभीर बाब आहे. समाज बळकट होण्याकरता हे आवश्यक आहे. व आपण यात लक्ष घालावे, अशी मी प्रार्थना करतो. यात जेलमध्ये परतलेले गुन्हेगारही असतात. अशा गुन्हेगारांना त्यामध्ये तीनपेक्षा जास्त मुले अथवा मुली असल्यास नसबंदी करणे सक्तीचे झाले तर हे काम होऊ शकेल. ज्या मुलीला चारपेक्षा मुले झाली तार व्हेसेक्टोमी अथवा ट्युबेक्टोमी करणेच भाग आहे. आपल्याला बरेच दिवसात मुलगा नाही ही काही तक्रार होऊ शकत नाही. अण्णा हजारे साहेब समाजसेवक आहेत. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला. असे सांगत असत पण कोणीच येत नाही, असे फार थोडे लोक आहेत. अण्णांकडे कार्यकर्त्यांची टीम आहे, त्यांना हा प्रचार करणे.. अण्णा हे काम आपले मानून त्याचा प्रसार करावा असा आपला आग्रह आहे. मध्यंतरी गाडगेबाबा ग्रामीण अभियान यात काही गावातील मी स्वतः फिरून आलो. गाव अगदी स्वच्छ व देखणे आहे. जेथे पाणी नाही तेथे विहीर खोदून पंप बसविले जात आहेत… काही ठिकाणी बरेच वृक्ष लावले आहेत. अशी खेडी फार म्हणजे फारच थोडी आहेत. बाकी सर्व खेडे निराक्षित व स्वतःपासून पोरके झाल्यासारखे वाटले. कोणीही सांगते की, पाणी हेच जीवन आहे. आणि ते मिळवणे अशक्य आहे. आता वीज आणि पाणी हो दोन महाराष्ट्राला सतत सतवणारे प्रश्न आहेत आणि ते कसेही करून मिळालेच पाहिजे साधारणपणे १९४० ते १९५० सालची गोष्ट. अनेक मध्यमवर्गातही लोक प्रामाणिकपणे काम करावे व आपली सेवानिवृत्ती झाली की, प्रत्येक जण दहा ते १२ हजार रुपयांपर्यंत आपली पेन्शन जमवावी व थेट दादर अगदी विलेपार्ले अथवा ठाणे ते डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथे एक लहानसा प्लॉट घेऊन स्वतःचे असे घर बांधावे, असे एक स्वप्न होते. त्यावेळी पाण्याचा प्रश्न अजिबात नव्हता. प्रत्येक लोक आपल्या जागेत विहीर खोदून चांगले जिवंत झरे मिळत असत. त्यावेळी नळ पाईप हा विचार कधीच केला नव्हता. अगदी कोणीही गरीब अथवा श्रीमंत असोत. प्रत्येकाने रहाटाने पाणी उपसून पाणी भरत असे. विहिरीमध्ये कासव आणि मासे अवश्य सोडत असत. त्यामुळे रोगजंतू खाऊन टाकत असत. चाळीमध्ये काही लोकांना घरमालक एक विहिरीकरिता दोन, दोन ते चार सहा रहाट असत व पाणी उपसून देत असे. फार वर्षापूर्वी दादरला रस्ते धुण्याचे कामही करताना मी प्रत्यक्षपणे पाहिले आहेत. आता जग सुधारलेला. आता ब्लॉक सिस्टीमही सुरू झाली. मोठं मोठे चार पाच ते सहा सात ते अगदी दहा बारा मजल्यापर्यंत बिल्डर लोकांनी ब्लॉक्स बांधले. सर्व बिल्डर्सनी आपल्या विहिरी बुजविण्यात सुरवात झाली आणि मग एवढ्या पाण्याकरता पंप खेचूनही पाणी मिळेनासे झाले. पाण्याची ओरड सुरू झाली. आता पुढे काय असा यक्ष प्रश्न म्युनिसिपालटी अथवा सरकार यांनाही भेडसावू लागला. मध्यंतरी काही लोकांनी सौरऊर्जेचे प्रयोग करून पाहिला. तो बऱ्याच ठिकाणी यशस्वी झाला. आता उपाय एकच सर्व लोकांनी ऊर्जेचा प्रयोग कायद्याने बसविलाच पाहिजे, अशी सक्ती केली. तरच ते निभावेल. सगळीकडे हाहा:कार उडाला.
सौरऊर्जेचा पाणी तापविलेच पाहिजे. पण पाण्याशिवाय काय करणार १९५० साली भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मोक्षगुंडम विश्वश्वरैया यांची आठवण झाली ते यावेळी ९४ वर्षांचे होते. त्यांचा निवृत्तीचा काळ केव्हाच झाला होता. सेवानिवृत्तीनंतर तरी सर्व जग यांना ओळखते. अशा या थोर विश्वकर्मीना सन्मानाने पंडित नेहरू यांनी पाचारण केले. ते व त्यांचे सहकारी पंडित नेहरूंना भेटले व आपली व्यथा सांगितली. एम. व्ही. यातं हे मान्य केले. व भारतात अनेक दौरे केले व तीन महिन्यात आपला रिपोर्ट दिला. एम. व्ही. यांनी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे भारतात भरपूर पाणी आहे. मोठ्या नद्यांना सर्वत्र एकमेकांना जुळविल्यास नद्याचे व पावसाचे पाणी उपलब्ध होईल.
मात्र खर्चाची प्रचंड बाब होती. प्रचंड म्हणजे जवळजवळ ४०० कोटी रुपये होईल. परंतु ही रक्कम अतिशय अवास्तव झाल्याने काहीच झाले नाही व एम. व्ही. परत गेले.
परंतु पुढे भारतीय जनता पक्षाचे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. यांना एम. व्ही. ची गोष्ट माहीत होती. वाजपेयी यांनी हा प्रश्न परत हातात घेतला. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री सुरेश प्रभु यांना वाजपेयींनी याचा अभ्यास करण्यास सांगितले. याचवेळी राजकारणात गडबड झाल्याने भाजप सरकार कोसळले व सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला तसेच वाजपेयी यांनी राजीनामा देऊन फाईल परत लोकसभेत पाठविली.
हे जरी खरे असले तरी मी माळशेज घाटातून फिरून जात असताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे माळशेज घाटातील पाणी हा एक जटील प्रश्न आहे. टँकर येतो तो कधीच वेळेवर येत नाही. येतो तर तीन चार दिवसांनी येतो. या टँकरच्या हौदात पाणी सर्व स्त्रिया व मुलांची प्रचंड गर्दी होते. त्यातच बायका धुणी धुतात, तेथेच जनावरे येऊन पाणी पितात व येणाऱ्या जाणाऱ्या बायका आपली भांडी भरून पाणी घेऊन जातात. यात स्वच्छता किती व अस्वच्छता किती याचा विचार करावा. ग्रामीण योजनेत पाणी पंपाने बोअरवेलच्या सहाय्याने खेचून घेतात. आपल्याकडे काही लोक पाणी एक्सपर्ट असतात. कोणत्या गावात किती पाणी लागेल, तसेच साधारण कोठे लागेल हे सर्व लोक आपापल्या यंत्राद्वारे करतात. अशी जर एखादी बोअरवेल खणली तर भरपूर पाणी लागेल व लोक सुखी होतील. पण करावयास पाहिजे. या पाण्याने केवढे तरी सुख मिळेल. रोज येणारे टँकर किती लागेल, याचा अंदाज करावाच लागेल, याचा अंदाज काहीच नसतो. प्रत्येकवेळी मोजणारे टँकरमुळे या पाण्याचा खर्च अगदी सहजपणे निघून जाईल. हे केले पाहिजे.
साधारण २००९ साली मी मालदीव येथे राहावयास गेलो होतो. मालदीव हे बेट मुंबई ते मालदीव अशी विमानसेवा आहे. विमानातून उतरतानाच आपल्याला छोटी लहान मोठी समुद्राची बेटे दिसली. एअरपोर्टवर आम्ही सरळ टॅक्सीने एका बेटावर उतरलो.
तेथे पहावयास बरेच लोक होते. काही बेटे साधारण दोन ते अडीच किलोमीटर एवढे तसेच काही १५ ते २० किलोमीटर असावे. सर्व फिरून आल्यावर आम्ही बाहेर गेलो.
तेथेच बिस्लरीच्या बाटल्या मिळाल्या. आम्ही विचार केला की, आताच निदान पिण्याचे पाणी तर मिळेल. रूमवर सोडल्यावर एक नळ सोडला तर भरपूर पाणी, अगदी जोराजोराने आणि तेसुद्धा अतिशय गोड. खारटपणा अजिबात नाही. मी लगेच थोड्या वेळाने तेथे पोहोचलो. एक मोठी प्लॅस्टिकची यंत्रणा अशी बसविलेली होती. प्रचंड आवाज येत होता. खारटपणापासून गोडे पाणी कसे करावे, याचा कारखानाच चालू होता. साधारणपणे पाच ते दहा लाख लिटर पाणी आम्हाला पुरेल असे सारखे येत होते. परत विचार आला की, कोकण किनारपट्टीवर जर हा प्लँट बसविला तर निश्चित फायदा होईल. याचा विचार बीएआरसीने करावा. एवढेच नव्हे तर भारतातील सिमेन्स या कंपनीने अनेक अशा प्रकारे समुद्राचे गोडे पाणी करण्याची प्रक्रिया केलेली आहे. तसेच आपल्याला परर्शियनचे आखात येतेच समुद्राचे पाणी ते गोड करता येते. मग आपण का करू नये?
हा एक विचार होऊ शकेल. मध्यंतरी डॉ. राकेश नावाचे भारतीय वंशाचे अमेरिकन परत आले. येथे त्यांनी टरबाईन लावून वीज प्रकल्प करून दाखविला. मात्र चेन्नई येथे असताना विजेचा प्रयोग यशस्वी करून दाखविला होता. ही गोष्ट खरी आहे. व या राखेमुळे प्रदूषणाचा गावच्या व आसपासच्या लोकांना त्रास होतो. आणि म्हणूनच आपण थोरियमचा वापर व्यवस्थितपणे केला तर नवीन रिअॅक्टर संबंधी केला तर हा प्रदूषणाचा त्रास निश्चित कमी होईल व जनतेलाही होणार नाही. आणि असे जर नवीन रिअॅक्टर व हेवी वॉटर प्रोजेक्ट यांचा व्यवस्थितपणे उपयोग केला तर भारताला एकंदर २०,००० एमएनसी वीज पुरेल व आपल्याला साधारण २०२० साली भरपूर प्रमाणात वीज निर्मिती होऊ शकेल, असा डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या लोकसभेच्या आपल्या निवृत्तीच्या भाषणात केला. तारीख (९.४.२०१०).
आता प्रश्न येतो जैतापूरचा अणुप्रकल्प मी राजकारणी माणूस नाही. स्पष्ट सांगावयाचे म्हणजे माझा आणि राजकारणाचा कधीच संबंध आला नाही. आपल्याला जैतापूरचा वीज निर्मिती नको. कारण १ रिअॅक्टरमुळे मासे मरतात, २. दुसरे म्हणजे रिअॅक्टरचे धुळीकरण अंगाला चिकटण्याने कर्करोग होण्याचा धोका असतो. आणि सरतेशेवटी रिअॅक्टरच्या धुलीकरणांमध्ये वापरणारे बारीक कण शेतीत गेल्यास शेती नष्ट होते.
आता हे खरे की काय? परंतु या रिअॅक्टरमुळे एकही मासे मेलेले दिसले नाहीत. तसेच कुलींग टॉवरच्या सहाय्याने एकही कण कोणाच्या अंगावर सांडला नाही. अथवा एकही रिअॅक्टर धुलीकणाने कोठेही शेताचे नुकसान झालेले नाहीत. मग जैतापूरचा हा प्रयोग का चालू करू नये? जर सरकारी नोकरांना शक्य असेल तर आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोर्टात रीट अर्ज दाखल करावा व त्यातील हा प्रोजेक्ट नको असेल तर त्यांची कोर्टामध्ये आपली कैफियत मांडावी. तसेच आपल्या शास्त्रज्ञ यांना सन्मानाने बोलवावे व त्यांना आपले विचार आपणच मांडावे, असे सांगावे. सरतेशेवटी दोन अत्यंत निस्पृह व विद्वान लोक न्यायाधीश यांनी आपली कैफियत सांगावी. व हे लोक आपल्याला प्रकल्प हवा की, नको हे सांगावे. त्याचप्रमाणे मान्य झाल्यास हा प्रयोग चालू करावा. जर हा प्रयोग चालू झाल्यास रत्नागिरीच्या लोकांना जन्मजात वीज मिळेल तसेच नवे नवे उद्योगनिर्मिती होईल. त्याचप्रमाणे शाळा कॉलेजचे लोक शिक्षण घेतील. आपले अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आपल्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी २० हजार मेगायुनिट मिळाल्यास ती वर्षभर पुरेल. आज जगातील सर्व लोकांना अणुभट्टी रिअॅक्टर बांधणे अगत्याचे असेल आणि म्हणूनच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रकल्प होण्यासाठी जोरदार प्रयत्न करावेत. हा प्रोजेक्ट झाला तर लोकांचे भले होईल.
नुकतीच एक बातमी समजली. चेन्नई येथे कुडानकुलम हा एक अणुवीज प्रकल्प बनविण्याचा सरकारचा विचार होता. नेहमीप्रमाणेच चेन्नई येथील लोकांनी विरोध दर्शविला व शेवटी गोष्ट न्यायालयात गेली. बरेच वादविवाद, आचारविचार यांचे मल्लीनाथी झाल्यावर मद्रास हायकोर्टाने निकाल दिला की, कुडानकुलम येथे नवीन अणुभट्टी बनविण्यास कोणतीच अडचण नाही व मार्ग सुकर झाला. आता हेच प्रकरण आपण मद्रास उच्च न्यायालयात दिल्यास आपलेच भले होईल. व पाण्याचा प्रयोग व्यवस्थित चालू होता. तरी आपण का करू नये समजत नाही. एवढेच नव्हे तर पर्शियाचे आखातात समुद्रापासून तयार करण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याला त्यांना भरपूर यश येते. हेच आपण का करीत नाही. हा प्रश्न सोडविणे अत्यंत अगत्याचे आहे.
-श्री. मदन देशपांडे
Leave a Reply