नवीन लेखन...

आता स्वान्तसुखाय जगावे

प्रत्येकाचे एक भावविश्व असते. तो त्यातच रमलेला असतो. त्याच्या चालण्या बोलण्यातून त्याची स्वतःची अभिव्यक्ती प्रतिबिंबित होत असते. हा निसर्गच म्हणावा लागेल.

म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले जाते. या सर्वात केवळ मुक्त सुसंवाद महत्वाचा असतो. त्यासाठी माणसानं माणसात रहावं लागतं. आणि माणूस तसा समाजप्रीय आहे. हे वास्तव आहे.

एकलकोंडा स्वभाव किंवा एकांत हा भेडसावणारा असतो. निरागस बाल्यावस्थेत संस्कार होतात, विद्यार्जन होते. ऐन उमेदीच्या काळात आपण आपल्या सर्व कौटुंबिक कर्तव्यात इतर सर्व नैतिक कर्तव्यात, अत्यावश्यक कार्यात व्यस्त असतो. आपले जीवनाचे ध्येय गाठतांना वेळ कसा कुठे जातो हे कळतही नाही, संपूर्ण दिवस अपुरा पडतो. पण जेंव्हा हे निवृत्तीचे क्षण दत्त म्हणून समोर उभे रहातात तेंव्हा सावरण्याचे कुठलेच पर्याय उपलब्ध नसतील तर ते क्षण बेचैन होतात. ही वास्तवता आपण नाकारू शकत नाही. अशावेळी आपल्याला प्रेमाने समजून घेणाऱ्या सहवासाची नितांत गरज असते. त्यासाठी स्वतःचे मीत्व सोडून सर्वांच्यात समरस होणे हे खुपच महत्वाचे असते.

निवृत्तीनंतर आपल्या आवडी स्वतःच्या निवडीनुसार जगण्याची ईछ्या असते. जे क्षण आपल्याला ईछ्या असून देखील हवे तेंव्हा लाभले नाहीत ते उपभोगण्यासाठी आता आपल्याला वेळ देता येणे शक्य आहे. आणि त्याची निवड करून त्याचा आंनद घेणे, समाधान मिळविणे हे सहज सोपे असते. त्यासाठी जीवनात तडजोड ही फार महत्वाची असून आपल्याला आयुष्यातील सर्व नात्यांना शांततेने समजून घेणे आवश्यक असते.

उतारवयात आपण सर्वार्थाने कितीही मोठे असलो किंवा अगदी कितीही उच्यपदस्थ असलो तरी समाजकुटुंब आपल्याकडे दुर्लक्ष करतो आहे हे ही आपल्याला जाणवते.आणि ही सत्य वास्तवता आहे.

अशा अवस्थेत वयस्करांनी आपले मानसिक संतुलन सांभाळून जगात सर्वांशी मिळते जुळते घेणे हे फार महत्त्वाचे आहे.

जीवनातील जरा (वृद्धत्व) अवस्था हा निसर्ग आहे. ती सर्वांना येत असते. पण तेंव्हा या अशा अत्यन्त नाजूक वृद्धावस्थेत आपले आरोग्य सुदृढ ठेवणे, आपली स्वतःची वैचारिक मानसिकता विवेकी सकारात्मक ठेवणे मात्र गरजेचे आहे. या आयुष्याच्या संधीकालात सर्वार्थाने तडजोड करून सर्वांचीच मने प्रेमाने राखण्याचा आता प्रयत्न करणे सुखाचे ठरते. तसेच आता कुठलीच आसक्ती नसावी हेही मात्र खरं!

वृद्धत्वात आता ज्या गोष्टी जे छंद आपल्या हातातून सुटले आहेत, हरवले आहेत ते झाले गेले सारे विसरून त्याचा स्वानंदी रंग अंतरात भरण्यासाठी हृदयांतरी चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

त्यासाठी आपण आपल्या कुटुंबात, समाजात, आपल्या साऱ्या समवयस्क आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नात्यांच्यात, निर्मळमनी मित्रांच्या सहवासात रमणं आणि आपल्या अपेक्षित आत्मसन्मानात शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाही न दुखवता प्रत्येकाच्या मनात राहून जीवनानंद द्विगुणीत करत रहाणं, हे आपले विवेकी स्वान्तसुखाय कर्तव्य आहे.
वृद्धत्व ही अनुभवांची समृद्धी आहे. संघर्ष टाळून समजूतदारपणे ती मुक्तपणे उधळत रहाणे आपले कर्तव्य आहे.

अनंत हस्ते कमलावराने।
देता किती घेशील दो करांनी।
नेईल जेंव्हा तितुक्या करांनी।
सांभाळीशी तूं किती दो करांनी।

आपल्याजवळ जे देण्यासारखे आहे ते सर्वांना निरपेक्षपणे फक्त देत रहावे. दिल्याने आत्मिक प्रेम वृद्धिंगत होते. दातृत्व हेच खरे जीवनाचे वैभव आहे. निर्मोही सात्त्विकता ही खरी मन:शांती आहे. सर्वांती सारी त्या दयाघनाची कृपा आहे.

“देत रहा तू देत रहा मनुजा
आधार जीवा जीवा तूं देत रहा।

घेत रहा तूं घेत रहा मनुजा
आशीर्वाद तूं घेत रहा”

हीच जीवनाची कृतार्थी सांगता आहे.

इती लेखन सीमा

— वि.ग.सातपुते.

9766544908

दिनांक: १५ – ३ – २०२२.

पुणे.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..