आज सख्या रे मी खरेच तळमळले
आठवणीने तुझिया आतून हळहळले
एक लकेर ‘त्या’गाण्याची अन
क्षणात प्रीतीचे अपुले ऋतू मज स्मरले
तो किनारा एक सळसळता अन
वाळूत दोघांचे होते ठसे उमटलेले
मूक एक शेवटची भेट अन
हातात हात अखेरचे घट्ट गुंफलेले
पापण्यांच्या कडा ओलेत्या अन
चिंब धारा त्यात आपण भिजलेले
किती रे ऋतुमागून ऋतू हे सरले
आहे अजूनी कुपीत जपलेले
जे होते, मन माझे तुझ्यात पूर्ण गुंतलेले !!
— वर्षा कदम.
Leave a Reply