नवीन लेखन...

आठवणी चहाच्या- (चहा दिवसा निमित्ताने)

आठवतंय तेव्हांपासून अगदी पाच वर्षाची होते तेव्हांपासून चहा पीत होतो एवढं आठवतंय ..मुंबईतील दादरचं शिवाजी पार्कजवळील घर..तीन खोल्यांचं घर..स्वयंपाकघर छान मोठं..सकाळी घरातील सगळे खाली पाटावर बसून मस्त हसतखेळत चहापान होई .तेव्हां बशीत औतून फुंकून चहा पीत असू..आजच्यासारखे मग नव्हते..प्रभूकाकांना नेहमी काहीतरी खोड काढायची, चिडवायची सवय,.एकदम..” अगं , तो उंदीर तुझा चहा पितोय बघ , “..मला आधी खरंच वाटायचं..मी खरंच दचकून पहायचे..पुढे पुढे त्याची सवय झाली.,पण दरवेळी ते नवीन काहीतरी गंमत करत ..
त्यावेळी शेजारी रहाणार्या अमेंबलकाकूंनी मला एकदा चहापोळी खायला शिकवलं .तोपर्यंत मी कधीच चहात पोळी बुडवून खाल्ली नव्हती, मग आमच्या घरीही ते सुरु झालं . ही गोष्ट १९५० मधील , बिस्किटे वगैरे खूप नंतर आली.त्यावेळी दूधवाला दारी आणून देत असे ..पहाटे पहाटे दाराची घंटी वाजवणारा दूधवालाच असे. तेव्हां दूध प्लास्टिक पिशव्यात मिळत नव्हतं. दूधकेंद्र पण नंतर सुरु झाली जेथे काचेच्या बाटल्यात दूध मिळू लागलं .रोज घरातून सरकारकडूनच मिळालेली रिकामी बाटली घेऊन जावी लागे आणि ती परत करुन दुधाची बाटली मिळे, त्यासाठी सुटे पैसे सोबत ठेवावे लागत.
पुण्यात असतानाची एक आठवण ..१९६०/६१ सालची गोष्ट..घरासमोरील ग्राऊंडमध्ये दुधाचं केंद्र होतं ..निळ्या रंगाचं झोपडीवजा लाकडी घरच..एक दरवाजा, एक काऊंटर असलेली खिडकी.,बाहेर सगळे लोक रांगेने उभे रहात ..आपला नंबर आला की पैसे ,रिकामी बाटली/बाटल्या ठेवून दुधभरली बाटली घेऊन लोक जात. पहाटे पाच ते सहा यावेळेत ते मिळत असे..उशीर झाला की केंद्र बंद झालेलं असे. एकदा माझा नंबर आल्यावर दोन बाटल्या मी काएंटरवर ठेवल्या, पैसे देत होते तेवढ्यात तिथला माणूस ओरडलाच..” अगं, काय हे बाटलीत उंदीर घेऊन आलीस की..”..,सगळे लोक हसू लागले..मी पाहिलं तर खरंच बाटलीत उंदीर होता ..मला आश्चर्य वाटलं , तीन जिने उतरुन मी खाली आले तरी मला दिसला कसा नाही आणि तो बाहेर कसा पडला नाही.,. मी त्यावेळी १४/१५ वर्षाची असेन..माझी गंमत केली तरी मला कोणी काही बोललं नाही ..उलट ती बाटली बाजूला ठेवून दिली आणि मला दूधाच्या बाटल्या दिल्या. (काही दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रात दुधाच्या भरलेल्या बाटल्यात उंदीर निघाल्याची बातमी आली होती..आणि त्यावरुन लोकांना चर्चा करण्यास निमित्त मिळालं होतं..)
त्याच अंगणात मी संध्याकाळी सायकल शिकत होते..सुरवातीला मला कसे थांबायचे माहित नव्हते त्यामुळे उतरताना मी त्या दूधकेंद्राला धडक देऊन उतरत होते..कोणी शिकवायलाही नव्हते, माझी मीच शिकत होते तेव्हां..नंतर मला धडक मारताना कोणीतरि पाहिले आणि मला ब्रेक लावायला, वापरायला शिकवले..,(ते दूधकेंद्र नंतर ग्राऊंडच्या बाहेर हलवलं गेलं..एवढं मात्र आठवतंय …बहुतेक कोणीतरी मला धडका मारताना पाहिलं असावं…!!!!
..चहाशी संबंधित या आठवणी माझ्या कायम लक्षात राहिल्या आहेत एवढं खरं..,
..माहेरी सकाळी आणि संध्याकाळी असा दोनदाच चहा होत असे . पहिला चहा, दुसरा चहा हे लग्नानंतर पहिल्यांदा ऐकलं. लग्नानंतरचा सासरचा पहिलाच दिवस .घरी पाहुणेमंडळी होती सकाळपासून बरेच वेळा चहा होत होता. जाणारायेणारा ही होताच..घराचं दार दिवसभर उघडंच असे ..नवीन सूनबाईच्या हातचा चहा घेण्याचं निमित्त असे..आणि मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा होत..त्यात आणखी एखादा आला की परत चहा…आधी आधी कौतुक, गंमत वाटायची पण नंतर त्याचा थोडा उबग येऊ लागला होता ..पुढची कामं करणं कठिण होई..सासरे तर कधीकधी रस्त्यावरुन जाणार्याला हाक मारुन बोलवून घेत आणि ” चहा टाका” ची आर्डर येई .या सगळ्या लोकांना अत्यंत स्ट्राॅंग, खूप उकळलेला,उग्र कडवट, चहा आवडे ..तो कसा करतात हे एकदा सासर्यांच्या शाळेतील शिपायाने करुन दाखवला होता. ते पाहिल्यावर माझी तर चहा पिण्याची इच्छाच नाहीशी झाली. त्याउलट नवर्याला ” लाइट चहा” लागे , फार न उकळलेला, फिक्या रंगाचा ..त्यामुळे प्रत्येकाचा चहा वेगळा करणे एवढा एकच मार्ग असे.नाहीतर..एकाच चहावर दोन वेगवेळ्या काॅमेंटस्.,
” अगं, किती स्ट्राॅंग चहा”..,इति नवरा…आणि ” अगदी पुळचट झालाय, चहापत्ती नाही का घरात “..इति सासरे.!!!!!!
वायुसेनेतील आयुष्यात ” इंग्लिश चहा ” म्हणजे चहाची किटली, दुधाचे वेगळे पाॅट, साखरेचा वेगळा “शुगरपाॅट, एकदोन चमचे “..असा थाट असे .ज्याला जसा हवा तसा करुन देणे/घेणे..,उकळलेला जरा कमीच.
..पण कितीही वेगळ्या तर्हा असल्या तरी चहा तो चहाच..सकाळी तरतरी आणणारा, स्फूर्ती पैदा कणारा..परीक्षेच्या वेळी रात्री जागण्यास मदत करणारा ..लग्न ठरताना” चहा पोहे ” खासच असणारा..थंडीत आलं घालून केलेल्या चहाची वेगळीच मजा असणारा…..असा हा चहा..
या “चहा” ची चहा’ चहाबाजच जाणणार…
— देवकी वळवदे.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..