वाळूत ओढत रेघा,
मी बसले होते
आठवणींच्या विश्वात
मी रमले होते.
कुठून तरी चाहुल मला लागली
दुसरे नव्हते कुणी
माझेच मन होते
कधी मी मनाला
कधी मन मला
अनेक आठवणींचे झरे वहात होते
आठवणीच्या झऱ्यांनी शब्द मूक झाले
बोलण्याचे काम मग अश्रूंनीच केले.
– कु. निलांबरी शां. पत्की
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply