नवीन लेखन...

आत्मज्ञान !

इतरेजन जेव्हा योजना आखण्यात आणि स्वप्न पाहण्यात व्यस्त असतात, तेव्हा आपण आपल्या छोट्याशा प्रवासाचा आनंद घ्यावा. माझ्याभोवती खूप वैभव आहे, माझ्या क्षमता, दृष्टी आणि आकांक्षा यापेक्षा हे अधिक महत्त्वाचे आहे, मी सतत काहीतरी  ‘करण्यापासून’ आता फक्त ‘असण्यात’ मग्न आहे, अस्तित्वात असलेल्या सगळ्या लहानथोर गोष्टींनी ,बदलत्या संक्रमित निसर्गाने मी चकित होत असतो, असं वाटणं स्वाभाविक असतं.  मुख्य म्हणजे हे सर्व शांतपणे आणि आपोआप होत असते. सूर्य रोज उगवतो. त्याचा सूर्यप्रकाश प्रत्येक दरवाजा ठोठावतो. त्यामुळे योद्ध्यांना धैर्य, कार्यकर्त्यांना जोश, निरर्थकपणे प्रवास करणाऱ्यांना दिशा, कमकुवत व्यक्तींना विश्वास, सृजनशील व्यक्तींना स्वप्ने, संत्रस्तांना शांतता, आणि निराश असलेल्यांना  प्रकाश मिळतो.

छोटासा चमकणारा दवबिंदू प्रत्येक सर्जनशील मनामध्ये आशा निर्माण करीत असतो.  त्याच्यामुळे संगीतकारांना माधुर्य, साहित्यिकांना निर्मितीच्या वेदना,नर्तकाला लय, कलाकाराला अमूर्त निराकार सौंदर्याचा आनंद, गायकांना रचनांचे दैवीपण, शिल्पकारांना नव्या शिल्पाचे हाकारे, आणि कुंभाराला सममित भांडी डोळ्यासमोर दिसायला लागतात. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या अद्वितीय प्रतिभा आणि शक्यतांद्वारे विकसित होत असते.

जग संधींनी भरलेले असते.आपण त्याचा शोध घ्यायचा असतो आणि प्रत्यक्षात त्यांचे दर्शन होईपर्यंत प्रतीक्षा करायची असते.

आपण संभाव्य पर्यायांची सुरूवात, वाढ, विस्तार आणि गुणाकार या मार्गाने नकळत जात असतो. कधी रेंगाळतो, चालतो, धावतो, उडतो, पडतो आणि चढतो. या स्वतःच्या उत्क्रांतीबद्दल आपल्यालाच कधीकधी आश्चर्य वाटते. ज्यांनी गंभीर परिस्थितीत मार्ग दाखविला अशा सर्वांविषयी आपण मनापासून कृतज्ञ असतो.

आपल्याला विश्वाच्या जादूचे आश्चर्य वाटते, मग मानवी अस्तित्वाचे आपण आनंदसोहोळे करतो.

आपणास हिरव्यागार झाडांचा आनंद, निळसर आकाशाचे आरस्पानी सौंदर्य मोहित करीत असतात. या साऱ्या अद्भुताचा परिणाम म्हणून अंत:करणात समाधान, साधेपणा आणि आनंद भरून जातो. जीवनप्रवाह अखंड वाहता असतो आणि मानवी सामर्थ्याने तो थांबविला जाऊ शकत नाही.

निसर्ग आपल्या जीवनात अनाकलनीय रहस्यमय भूमिका पार पाडत असतो. जीवन केवळ निराशा, निरर्थकता आणि अपूर्णत्व नसते. ते उत्सवी, परिपूर्ण आणि अर्थपूर्ण असते. आपण अचानक संपूर्ण शक्तीनिशी या विश्वात अवतीर्ण होत असतो. आपण आनंदाच्या सर्वाधिक प्रतीक्षेत सदैव असतो. अशावेळी मनामध्ये एक मूलभूत बदल संभवतो.

जेव्हा जीवन अभावग्रस्त असते आणि आनंदाची गती मंदावते, तेव्हाच आपली समाधानाकडे नकळत वाटचाल सुरु झालेली असते. एकदा ती वाट गवसली की जीवन आवाक्यात येते. आणि आपल्याला जीवन-प्रवासाचे सार मिळते.

संतुलित मार्गाने जगण्यासाठी आपण सावध व सुसज्ज असले पाहिजे. हा आत्मसंयम आपल्याला पुढे जाण्याची नवीन शक्ती देतो. आपल्याला हेही जाणवायला हवे की एकरूपता आणि एकाकीपण दोन्ही एकमेकांना पूरक असतात. परिपूर्ण अवकाशाशी ऐक्य साजरे झाले की आपण चिरस्थायी यशाकडे अधिक जाणीवपूर्वक जाऊ लागतो. एखाद्याचे स्वतःचे कर्मचक्र काय आहे हे समजल्यासच हा प्रवास शक्य असतो.

निसर्गापुढे प्रामाणिकपणे झुकण्यातच आपली कृतार्थता असते. गोष्टी घडविण्याऐवजी त्यांच्याबाबत विचार करणे सोडून द्यावे आणि जशा आहेत तशा त्या स्वीकाराव्यात. स्वत:ची इच्छित कृती केल्यावर आपण एक असा शेवटचा बिंदू गाठतो ज्यामध्ये सर्व काही विलीन होते. ती कंपने जीवनचक्राच्या पलीकडे जाऊन संवेदनाशीलतेने जवळ करायची असतात. विश्वाच्या सार्वत्रिक कायद्याच्या चलनवलना पुढे व्यक्तिमात्रांची सांसारिक दुःखे  कःपदार्थ असतात याची जाणीव हा आपला गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग असतो. आपल्याला दु:ख आणि मृत्यू पासून मुक्ती मिळते. हीच स्वानुभूती असते.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..