उघडताच लोचने रूप तुझेच सामोरी
दर्पणी, प्रतिबिंब तुझेच गं सामोरी
हरविला काळ, जरी दग्ध विरहात
सांत्वनी क्षण बकुळगंधलेले अंतरी
तुझ्या निर्मळ लाघवी प्रीतभावनांचा
अवीट स्पर्शभास अविरत हृदयांतरी
या जगण्याचा, हव्यासही तुजसाठी
तुजवीण जीवन, एक घाव जिव्हारी
निसर्गी, जरी आविष्कार ऋतुऋतूंचे
पंचमहाभूतांचे थैमानही जरी अंतरी
तरी तव स्मृतींचा, आत्मानंद कृपाळू
उघडताच लोचने रूप तुझेच सामोरी
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १२३
२२ – ९ – २०२१.
Leave a Reply