जननी! तूं नि:ष्पाप भोळी
सर्वांची, मनांतरे राखणारी
मी, अजूनही स्मरतो आहे
लडिवाळ, तुझी रित न्यारी
सहजी थोडेसे हसुनी अंतरी
जगविण्यास जगावे निरंतरी
निस्वार्थी! तुझाच अट्टाहास
वात्सल्यप्रीतीची, रित न्यारी
कुणी काहीही, बोलत राहो
निरपेक्षी! रमुनिया संसारी
मौनातुनी शोधावे आत्मसुख
विलक्षणी! तुझी रित न्यारी
कधीतरी जगावे मनासारखे
त्यागाधिष्टता! जरी संस्कारी
अस्मितेला! निक्षूनीच जपावे
जग! सारेच हे नाना विकारी
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ६९.
३ – ३ – २०२२.
Leave a Reply