चोखपणे तू हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा
कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा…१
घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ
क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ..२
सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते
आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते….३
पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी
वेचूनी त्यातील भलेबुरे , मागे राहतील विविध आठवणी….४
हाच हिशोब जीवनाचा, दुजा वाचतो इथेच पाढा
इतरांसाठी जगता जेव्हां, सार्थकी होतो आयुष्य लढा…५
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०