आयुष्याच्या संध्याकाळी
संपते जीवाची ही वात
गात्र कुरकुरू लागली
मन भरून सारखं
तुला पाहू वाटतं
थरथरे माझे हात
घेण्या तुझा हात हाती
एक जीव एक प्राण
तुझ्या माझ्या संसाराची
जन्मभर साथ दिली
आता सोडून चालले
एकला समजू नको
तुला पाहतील हे डोळे
तो येईलचं आता
काळाच्या कुशीत न्यायला
जरा विसावते आता
मग जमेल जरा जायला
जाईन मी पुढे
ठेवीन जागा तुझ्यासाठी
सार मागच आटपून
ये पुढच्या प्रवासासाठी
— वर्षा कदम.
Leave a Reply