माणसांच्या या गर्दीतूनी
मी माणूस शोधतो आहे
कधी कधी मलाच वाटते
मीच, रस्ता चुकलो आहे
चेहरे तसे सारे ओळखिचे
पण सारेच संभ्रमात आहे
मनात, सारीच साशंकता
सत्य,असत्य कोणते आहे
जगणे, कसरत तारेवरची
वाटते सारे, मृगजळ आहे
आज नां कुणावरी भरवसां
बेभरोशी नित्य जगणे आहे.
सभोवती दुरापास्त मानवता
जग स्वसुखातची मग्न आहे
नाती निरागस आज संपली
आपुलकीचीच वाणवा आहे
जीवा, जगविती स्पर्श निर्मल
त्याचीच एक अभिलाषा आहे
तीच एक, शाश्वत सुखसंपदा
माणसांच्यात मी शोधतो आहे
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०१.
३ – ४ – २०२२.
Leave a Reply