मराठी माणसं म्हणजे चौकटीत किंवा साचेबध्द जीवन जगणारा,कधीही जबाबदारीसाठी कचरणारी आणि आपण व आपलं काम बरं यातच धन्यता मानणारा असं सर्वसाधारणपणे अपसमज अनेकांनी आत्तापर्यंत करून घेतला होता. पण आपल्या देशात जेव्हा केव्हा राष्ट्रीय,सामाजिक,सांस्कृतिक क्रांती झाली त्यावेळेस मराठी माणसानीच सर्वप्रथम पुढाकार घेतल्याचं इतिहासात डोकावल्यावर कळतं.
१) देशात १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा ज्योतराव फुले यांनी सुरू केली.त्यामुळे महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला.
२) देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका होण्याचा बहुमान मिळवला तो म्हणजे महात्मा ज्योतराव फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले.आपल्या पतीच्या शिक्षणासाठी असलेल्या दुर्दम्य इच्याशक्तीच्या बळावर त्यांनी ही किमया साध्य तर केलीच पण पुढे जगातील अनेक तरूणींसाठी त्या प्रेरणास्त्रोत बनल्या.
३) देशातील विलायतेत जाऊन शिक्षण घेणारी व पहिली भारतीय महिला डॉक्टर म्हणजे आनंदीबाई जोशी.
४) आपल्या देशात शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करुन त्याचाशी संबंधित असणा-या औजारांचा उद्योग पहिल्यांदा सुरु करण्याचा मान जातो उद्योगमहर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना,तसंच देशातील पहिली औद्यौगिक नगरी उभारण्याचा बहुमान ही त्यांना जातो.
५)जो उद्योग आज जगात क्रमांक १चा म्हणून गणला जातो अश्या चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणा-या धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली “राजा हरिश्चंद्र” या मुकपटाची निर्मिती करुन चलतचित्राचं
युग भारतात निर्माण केलं.
६)देशातील मुकपटाच्या पहिल्या स्त्री कलाकार म्हणजे कमलाबाई गोखले.मोहिनी भस्मासुर या दादासाहेब फाळके निर्मित मुकपटात त्यांनी बालकराकाराची भूमिका साकारली होती;त्याआधी स्त्री पात्रांची भूमिका पुरूष कलाकार साकारत.
७) साधारणत: १९३१ ला रुपेरी पडद्यावर बोलपट युग सुरु झालं व याच दरम्यान म्हणजे १९३२ ला “प्रभात फिल्म कंपनी”चा अयोध्येचा राजा प्रदर्शित झाला या बोलपटाच्या अभिनेत्री होत्या “दुर्गा खोटे”.म्हणजे दुर्गाबाई खोटेंच्या रुपानं भारतीय सिनेमाला पहिल्या अभिनेत्री मिळाल्या.
८) भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं व त्यानंतर १९५० साली आपली राज्यघटना अस्तित्वात आली.या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते “डॉ.भिमराव आंबेडकर उर्फ डॉ.बाबासाहेब आंबेडकर”
९) भारतात स्वराज्याची मुहूर्तमेढ व स्थापना करणारी पहिली व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
१०) १९५२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विश्व ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं वयक्तिक सुवर्णपदक मिळवुन देण्याचा बहुमान पटकवला कुस्तीपटू खाशाबा जाधाव यांनी.
११) आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात पहिला भारतीय सिनेमा म्हणजे”संत तुकाराम” व्हेनिस चित्रपट महोत्सवात १९३६ रोजी जगातील ३ सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी या चित्रपटाला ही सन्मान मिळाला होता.या चित्रपटाचे दिग्दर्शक होते व्ही.शांताराम.
१२) देशात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांना १९५२ रोजी सुरुवात झाली या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचा पहिला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट ठरला “श्यामची आई”.पहिलं राष्ट्रपती सुवर्णकमळ पुरस्काराचा बहुमान मिळवून अखिल भारतात या चित्रपटानी सर्वत्र कौतुकाची थाप मिळवली.या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन होतं आचार्य प्रल्हाद अत्रे यांच.
१४) अखिल गायन व संगीत विश्वात गानकोकिळा,गानसम्राज्ञी,स्वर आणि सुरांची देवता म्हणून आदरानं,आणि अभिमानानं घेतलं जाणारं नाव म्हणजे अर्थाततच भारतरत्न लता मंगेशकर.
१५) आंतरराष्ट्रीय “रेमोन मॅगसेसे पुरस्कार” मिळवणारी भारतीय आणि आशियाईवखंडातील पहिली व्यक्ती म्हणजे आचार्य विनोबा भावे.
१६) एस.एन.डी.टी हे देशातील मुलींसाठीचं पहिलं विद्यापीठ सुरू करण्याचा बहुमान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जातो.
१७) आयुष्यात कधीही साध्या विमानात पाऊलही टाकलेले नसताना शीतल महाजन १४ एप्रिल २००४ रोजी ३००० फूटांवरून, उणे ३७ डीग्री तापमानात पॅरॅशूटच्या साहाय्याने चक्क उत्तर धृवावर उडी मारली आहे. अशी उडी तिने याआधी सरावासाठीही मारलेली नव्हती. पहिली मारली ती थेट उत्तर धृवावरच! अर्थातच हा विश्वविक्रम झाला शीतलच्या नावावर. ती इथेच थांबली नाही. उत्तर धृवावरून ती परतही आली नसेल, तोवर तिने मनाशी निश्चयही केला की पुढची उडी दक्षिण धृवावर! आणि तीही ’फ्रीफॉल जम्प’- म्हणजेच ज्यामधे तब्बल १५,००० फुटांवरून हवेत स्वतःला झोकून द्यायचं आणि ४००० फुटावर आल्यावरच पॅरॅशूट उघडायचं! ही उडीही तिने यशस्वीपणे पूर्ण केली. १७ डिसेंबर २००६ रोजी १२००० फूट उंचीवरून आधी फ्री फॉल व त्यानंतर पॅराशूटचे साहाय्याने दक्षिण ध्रुवावर उडी मारून एक गौरवास्पद जागतिक विक्रम केला. अशा प्रकारची उडी मारणारी ती जगातील पहिली महिला ठरली. त्यानंतर,१९ सप्टें २०१० रोजी तिने १३००० फुटांवरून बर्ड जम्पिंग केले. हा नवीन विक्रमही तिच्या नावावर कोरला गेला. २६ ऑक्टो. २०११ रोजी शीतल महाजन हिने अमेरिकेतील स्कायड्राईव्ह अँरिझोना येथे ५८००० फुटावरून हॉट एर बलूनमधून उडी घेऊन नवा विक्रम प्रस्थापित केला. अशी उडी घेणार ती पहिली भारतीय महिला ठरली असून, तिची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली असून,तिच्या आतापर्यंत ४४५ पॅराशूट उड्या झाल्या आहेत. शीतलने याआधी पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवावरून पॅराशूट जंप घेतली असून, ती जगातील कमी वयात कोणत्याही सरावाशिवाय कामगिरी करणारी महिला आहे.
१८) मुंबई विद्यापीठाचे भारतीय फेलो म्हणू निवड झालेली पहिली व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होय.
१९) आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत,२५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावून भारताच्या राही सरनौबत ने इतिहास रचला असून, सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे.
२०)अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाणरे पहिले भारतीय शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. अनिल काकोडकर.भारताला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, थोरियमसारख्या स्वस्त आणि भारतात सहज उपलब्ध असलेल्या अशा स्रोतापासून ऊर्जा बनवण्याचे स्वप्न काकोडकर यांनी पाहिले आणि त्या दिशेने बरीच ठोस प्रगती केली आहे.
२१) क्रिकेट या खेळाला भारताकडून सर्वोच्च स्थानी नेऊन, स्वत: क्रिकेट-वीर, विक्रमांचा बादशाह, आणि जगातील क्रिकेट खेळाडू व क्रिकेट चाहत्यांचा गॉडफादर म्हणजे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर. शतकांचं पहिलं महाशतक तसंच सर्वच टेस्ट, वन-डे मॅचेस मध्ये विक्रम नोंदवणारा जगातील पहिलाच खेळाडू. याची दखल सर्वच वर्ल्ड रेकॉर्डस् ही वेगवेगळी घेतलेली आहे.
२२) भारतात “रियालिटी शोज चं” पर्व सुरु झालं ते म्हणजे ९० च्या उत्तरार्धात. अशा वेळी अनेक लोकप्रिय शोज् चर्चेत असायचे “कौन बनेगा करोडपती” या आगळ्या-वेगळ्या तसंच अचूक उत्तरं देणार्या स्पर्धकांना हा मान मिळत, व या गेम शोचा पहिला विजेता मानकरी ठरला मुंबईचा हर्षवर्धन नवाथे.
२३) “गांधी” या चित्रपटामुळे भारताला “ऑस्कर पुरस्काराची ट्रॉफी” पहिल्यांदा मिळाली, ती म्हणजे या चित्रपटातल्या सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी आणि या चित्रपटांच्या सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार ठरल्या. “भानु अथय्या” उर्फ भानु राजोपाध्ये, म्हणजे या देशातील पहिली ऑस्कर ची मानकरी ठरणारी व्यक्ती ही मराठीच होती.
एकंदरच जेव्हा केव्हा “देशात प्रथम” अशी व्याख्या समोर येते त्यावेळेस मराठी माणसाचं नाव हे अग्रक्रमावर राहिलं असून “सह्याद्रीची शान” हा “देशाचा मान” व “महाराष्ट्राचा स्वाभिमान वाढवणारी ठरली असून इथुन पुढे ही परंपरा सुरु राहील,अशी किमान अपेक्षा तरी या महाराष्ट्र दिनी बाळगायला काहीच हरकत नाही.
— सागर मालाडकर
Leave a Reply