म्यानमार (वर्मा) मधील असंख्य आबालवृद्धांची ही अजूनही ‘शान’ आहे.त्यामुळेच तेथील युवक-युवतींच्या टी शर्टवर तिचे छायाच असते, तसेच इतर जीवनोपयोगी वस्तूंवरही तिच्या छायाचित्रांचे दर्शन होते. कारण एकच म्यानमारमधील जुलमी राजवटीविरुद्ध तिने सुरू केलेला संघर्ष. या संघर्षाला तेथील जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिला होता. या शांततापूर्ण
चळवळीबद्दलच तिला १९११ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. त्या महिलेचे नाव आहे आगसान सु की.
आधुनिक म्यानमारचे संस्थापक असलेले यू आंग सान यांची सू ही मुलगी. तिने तिच्या जन्मापासूनच घरात जणू राजकारणाचे धडे घेतले होते. तिचे वडील यु आंगसान यांचा म्यानमारच्या सत्तासंघर्षात बळी गेला. त्या वेळी सू अवघी दोन वर्षांची होती, त्यामुळे त्यांचा राजकारणाचा वारसा सांभाळण्याची जबाबदारी सू वर अल्पवयातच आली. सू ची आई बर्माची राजदूत म्हणून भारतात आली. त्यामुळे सू चे प्राथमिक शिक्षण दिल्लीतच झाले. तेथेच तिला महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीची माहिती झाली व त्यातूनच तिला प्रेरणा मिळून पुढे म्यानमारमध्ये गेल्यानंतर तिने प्रस्थापित लष्करी राजवटीविरुध्द जनलढा उभारला. तिच्या या लढ्याला युवक-युवतींचा प्रचंड पाठिंबा मिळाला. रोज प्रचंड मोर्चे, सत्याग्रह यामुळे तिने तेथील लष्करी राजवटीला जेरीस आणले. सूचे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्यात आला.आंदोलनकर्त्यांवर केलेल्या गोळीबारात तीन हजार आंदोलनकर्ते मारले गेले, तरीदेखील सू डगमगली नाही. ती राजकारणात सक्रिय होत गेली. तिच्या आंदोलनाला यशही मिळत गेले. तिचे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारला तेथे निवडणुका घेणे भाग पडले.
या निवडणुकीत सू च्या पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले. मात्र लष्करी राजवटीने तिच्या हातात सत्ता सुपूर्द न करता निवडणूक रद्द करुन तिला नजरकैदेत ठेवले.
नजरकैदेत असतानाच तिला शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र नोबेल स्वीकारण्यासाठीही तिला कैदेतून सोडण्यात आले नाही. त्यामुळे तिच्या वतीने पती एरिस मुलाने या नोबेल पुरस्काराचा स्वीकार केला.
Leave a Reply