अबोलीची केशरी वेणी,
नेसले केशरी साडी,
अस्सल सोन्याने मढले ग,
जसा जाईचा जणू बहरच ग,
केशरी सुंदर टिळा लाविते, मोगऱ्याचे फूल केशी ग,
भोवती दरवळ भारते ग,
टपोरे मोतीच पेडी गुंफते ग,
हाती गुलाब घेऊन माझ्या,
प्रियाची वाट मी पाहते ग,
गुलाब प्रतिक ना प्रेमाचे,
गुलाबी पाकळ्या गाली ग,–!!!
लाजलाजूनी म्हणते मग,
कोण त्यांचा खरा वाली ग,–!!
तरल, मृदू ,कोमल पाकळी,
तशीच गालावरची खळी ग,
मनमोहक तारुण्य उमलते,
अंगावर गुलाबी गेंद ग,–!!!
स्पर्श करता काटा बोचे,
सांभाळून रहा सारे,
जखमी होईल तन, मन बरे,
जुई सायली जशी नखरेल ग,
सोनचाफे भरभरून,
मी लुटते बाई ग,
सौंदर्य आणि सुगंधाची,
आज खरी लयलूट ग,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply