नवीन लेखन...

अपघाताने खुब्याच्या सांध्याला होणारी इजा

हल्ली वाढलेल्या मोटर अपघातांमुळे या सांध्याला होणाऱ्या इजा वाढल्या आहेत. यात सांधा निखळणे, सांध्यातील उखळीला अस्थिभंग होणे, तसेच फीमरच्या डोक्याला व त्याच्याखाली असलेल्या मानेजवळ (नेक ऑफ फीमर) अस्थिभंग होणे आदी गोष्टी होऊ शकतात. खुब्याचा सांधा बाहेर येणे किंवा निखळणे हे मोठ्या मारानेच होऊ शकते.

असे झाल्यास अगदी लवकरात लवकर तो सांधा उखळीत बसविणे अत्यावश्यक असते. नाहीतर या सांध्याचा रक्तप्रवाह कायमचा खंडित होण्याची भीती असते. उखळीला अस्थिभंग झाला असल्यास सी. टी. स्कॅन किंवा एम. आर. आय. करून त्यानंतर त्याचे योग्य ऑपरेशन करून उखळीला पूर्ववत करण्यात डॉक्टरांना यश येते. ही उखळीतील हाडे व्यवस्थित जुडेपर्यंत रुग्णाला कुबड्यांवर चालावे लागते. पूर्ण वजन देण्यास काही काळ मनाई असते. फीमर हाडाच्या डोक्याजवळ जो हाडाचा भाग असतो त्याला फीमर हाडाची मान (नेक) म्हणतात. येथील अस्थिभंग होणे हे वयोवृद्धात अगदी नेहमीचे आहे. याचे कारण वयोवृद्धात हाडातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते व हा भाग कमकुवत झालेला असतो.

अल्पशा आघाताने हे हाड मानेत तुटते. हाडाच्या कोणत्याही इस्पितळात असे अनेक रुग्ण आढळतात. ही फीमरच्या मानेजवळ तुटलेली हाडे शस्त्रक्रिया करून स्क्रू व प्लेटने धरून ठेवली जातात. साधारणतः ३.४ महिन्यांनी क्ष-किरण चिकित्सा करून ही हाडे जुळली असल्यास रुग्णाला पायावर पूर्ण वजन देऊन कुबड्याविरहित चालावयास डॉक्टर परवानगी देतात. हल्ली नवीन प्रकारच्या सळ्या घालूनही ही हाडे धरून ठेवली जातात. याचा फायदा असा, की रुग्ण लगेचच पायावर पूर्ण वजन टाकून चालू शकतो. यथावकाश हाड पूर्णपणेही
जुळते. परंतु ही शस्त्रक्रिया अगदी योग्य प्रकारे केली गेली तरच चांगले यश मिळते. कधी कधी अधिक वयस्क व्यक्तींना अशा प्रकारे अस्थिभंग झाल्यास कृत्रिम खुब्याच्या सांध्याचे रोपण केले जाते. त्यामुळे रुग्ण ताबडतोब चाल लागतो.

डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..