पृथ्वीचा अक्ष २३. ४५ अंशाने कललेला असल्याने सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या प्रमाणात बदलत असते ह्या सूर्याच्या मार्गाला आपण आयनिकवृत्त असे म्हणतात. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या ध्रृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रृवीय भागात असतो. अशा प्रकारे वर-खाली सरकताना तो दोन वेळा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या समान पातळीत येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात. हे दिवस म्हणजे २१ मार्च रोजी म्हणजेच ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रृवीय भागात प्रवेश करतो, आणि २३ सप्टेंबर रोजी ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या दक्षिण ध्रृवीय भागात प्रवेश करतो. आपण विषुववृत्तावर असाल तर ह्या दोन दिवशी सूर्य दुपारी १२ वाजता बरोबर डोक्यावर असतो.
२१ मार्च ह्या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास ‘वसंतसंपात’ म्हणतात तर २३ सप्टेंबर ह्या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास ‘शरदसंपात’ असे म्हणतात. तसेच २१ जून ह्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर उत्तर भागात आलेला असतो ह्यालाच उत्तरायण असे देखिल म्हणतात, तर २२ डिसेंबर ह्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर दक्षिण भागात असतो. ह्यालाच ‘दक्षिणायन’ असे देखिल म्हणतात.
पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते. त्यामुळेच दिवस व रात्र हे प्रहर व ऋतु निर्माण झाले. पण पृथ्वीचा अक्ष थोडा कललेला असल्याने प्रत्येक वेळी विषुव वृत्तच सूर्याच्या समोर असते असे नाही. त्यामुळे दिवस लहान-मोठा होत राहतो. मात्र २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी पृथ्वीचे विषुव वृत्त सूर्याच्या समोर येते व दिवस आाणि रात्र ढोबळ मानाने समान असतात. अर्थात दिवसाच्या गणनेतील काही त्रुटी आजही बाकी असल्याने लिप वर्षासारख्या काळात हा दिवस पुढे-मागेही होतो.
आजपासून दिवस मोठा होऊ लागणार व त्यामुळे गोठवणारी थंडीही कमी होऊन वातावरण ऊबदार बनू लागते. यासाठीच युरोपातील अनेक देशांत आज सणाचा आनंद साजरा होतो.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply