माझे ‘हे आम्ही का करायचे ?’ हे पुस्तक २००२ साली प्रकाशित झाले. त्यातील माहिती खाली देत आहे.
समाजात गुरुचरित्राबद्दल फार भाविकतेने बोलतात. मी मात्र अभ्यास म्हणून गुरुचरित्र वाचले. गुरुचरित्रात छत्तिसाव्या अध्यायात ब्राह्मणाच्या कर्माचरणात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत २५ ते ३० वेळा आचमन सांगितले आहे. स्नानाअगोदर लघुशंका आचमन सांगितले आहे. (कामतांच्या गुरुचरित्रात) माझ्या दृष्टीने गुरुचरित्र लिहिणारे सामान्य लेखक किंवा कवी नव्हते. त्यामुळे शेकडो वर्षे गुरुचरित्र टिकून आहे. हल्ली ५० वर्षापूर्वीचे लेखकांचे साहित्य मिळत नाही. गुरुचरित्र मात्र टिकून आहे. म्हणून मी त्या अध्यायातील आचमनांची लिस्ट केली. त्याप्रमाणे आठ दिवस आचमन त्या त्या प्रमाणे करून बघितले. मी संध्या करीत नाही. पण संध्या करायच्या ज्या वेळा आहेत त्यावेळी नुसते आचमन केले . शरीर हलके वाटू लागले. असिडिटी कमी झाली. नंतर आचमनाच्या वेळी जी नावे घेतात ती न घेता फक्त आचमन म्हणजे प्रत्येक वेळी तीन पळ्या पाणी पिऊन पाहिले. तरी तोच फायदा झाला. हे मी माझ्या एक डॉक्टर मित्राला सांगितले. तो म्हणाला, ” बरोबर आहे.” आपण पाणी कितीही प्यायलो तरी त्यातील थोडेसेच पाणी एका वेळी रक्तात घेतले जाते व अंतरा अंतराने घेतलेले थोडे पाणी रक्तात जाते. त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राहून ऍसिडिटी, बी. पी. कमी होणारच. हल्लीचे सलाईन तरी काय आहे ? तसेच आहे.
आहे ना? आमच्या पूर्वजांनी देवाच्या नावाखाली सामान्य लोकांना शरीर नीट ठेवण्यासाठी शास्त्रच वापरले. फक्त आम्हाला ते माहीत नाही म्हणून टाकाऊ म्हणून आम्ही ते सोडून दिले.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
Leave a Reply