नवीन लेखन...

केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत गोखले

जन्म.३ जानेवारी १९४६

अधिकारी अनेक असतात; मात्र गावकऱ्यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या गळ्यातील ताईत होण्याचे भाग्य कमी जणांना लाभते. अच्युत माधव गोखले हे त्यांपैकीच एक. नागालँडचे तत्कालीन मुख्य सचिव आणि केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव, ही झाली त्यांची औपचारिक ओळख. व्यासंगी, अभ्यासू आणि वंचित-शोषितांना आपलेसे करणारे अष्टपैलू अधिकारी म्हणून ते लोकप्रिय होते. नको त्या कामात खर्च होणारा ग्रामनिधी रचनात्मक कामासाठी उपयोगात आणून, त्यांनी नागालँडच्या ग्रामीण भागात क्रांती घडवली. त्यांनी अमलात आणलेल्या ‘व्हिलेज डेव्हलपमेंट बोर्ड’ या अभिनव योजनेची सरकारला दखल घ्यावी लागली. नागालँडमधील गावांना स्वयंपूर्ण करण्याचे काम या योजनेने केले. या मूलभूत कामाबद्दल त्यांना पद्‌मश्री सन्मान देण्यात आला.

बोडो चळवळीमुळे नागालँड अशांत असतानाही, गोखलेंनी पायाभूत कामांवर भर दिला. नागा रहिवाशांनी ‘फादर ऑफ व्हिलेज डेव्हलपमेंट बोर्ड’ या सन्मानाने केलेला गौरव त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा होता. एखाद्या प्रकरणात न्यायदान करावे, इतका अतूट विश्वास त्यांनी कमावला होता.

नौदलातून सनदी सेवेत आलेले गोखले १९८३मध्ये नागालँडचे शिक्षण सचिव झाले. १९८७मध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सहसचिव म्हणून त्यांनी काम केले. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या एकत्रीकरणातून ‘जवाहर रोजगार योजना’ अस्तित्वात आली.

नागालँडमध्ये त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि लोक आर्थिक विकासाचा पाया रचला. वन आणि पर्यावरण मंत्रालयात केंद्रीय सचिव म्हणून काम करताना त्यांनी बीटी कॉटनला मान्यता दिली. ते भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्षही होते. ऊर्जा विभागात असताना त्यांनी ‘द एनर्जी रिसोर्स इन्स्टिट्यूट’ची (टेरी) स्थापना केली. निवृत्तीनंतर चेन्नईच्या एम. एस. स्वामिनाथन संशोधन केंद्रात कार्यकारी संचालक म्हणून काम करून, गुणात्मक बदल घडविला. वनस्पतींची छायाचित्रे काढणे, संगीत ऐकणे हे त्यांचे छंद होते.

अच्युत माधव गोखले यांचे १८ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..