माझ्या फुलांचे संशोधनात शेवंती असिडिटी, पित्ताचा त्रास ह्यावर उपयोगी आहे असे आले.
शेवंती कोणतीही चालते, पांढरी किंवा पिवळी. त्या फुलांना शेवंतीची वास आला पाहिजे हे महत्वाचे, कारण आजकाल शेवंतीच्या जवळपास दिसणारी पांढरी व पिवळी फुले मिळतात, परंतु त्यांना शेवंतीचा वास नसतो. शेवंतीच्या फुलाच्या पाकळ्यांचे पाणी करावे, त्यामुळे आम्लपित्त,अँसिडिटी जाते. अगदी उत्तम गुण येतो. आज त्रास होतो म्हणून हे पाणी घेतले तर उद्या चमचमीत खाल्ले तरी त्रास होत नाही. असा माझा अनुभव आहे.
एकदा तिखट खाल्याने पोटात खूपच जळजळ होत होती. शेवंती असिडिटी वर आहे म्हणून शेवंतीच्या फुलांचे पाकळ्यांचे पाणी प्यायलो, तीन तासात पोटातील जळजळ, आग थांबली. म्हणून पुन्हा एक डोस घेतला. बरे वाटले. ठरवले आता तिखट (स्पायसी )खाणे नाही. त्रास होतो. आणि दुसरे दिवशी नेमकी बरेच दिवसांनी भेटलेल्या मित्राबरोबर बेडेकर ची मिसळ खावी लागली. खाताना मनात विचार आला मिसळ त्रास देणार आहे. पण शेवंती चे पाणी घेऊ, आणि मिसळ खाल्ली. घरी आल्यावर कामात शेवंतीचे पाणी घेणे विसरून गेलो. दुसरे दिवशी संध्याकाळी लक्षात आले अरे आपण शेवंतीचे पाणी घेतले नाही, पण त्रास पण झाला नाही.
प्रयोगातून असे लक्षात आले कि पाण्याचा इफेक्ट ४-५ दिवस राहतो. एकदा पाणी पाकळ्यासकट घेतले तर त्याचा इफेक्ट जवळ जवळ दोन महिने राहिला. आता पाकळ्या सुकवून गोळ्या केल्या व पेशेंटना दिल्या, त्यांना चांगला फायदा झाला.
माझ्या आईला (वय ८०) पित्ताचा त्रास खूप व्हायचा, पित्त उलटून पडायचे (हा त्रास ४० वर्षे होता). तिला शेवंतीचे पाणी दिल्यामुळे तो कमी झाला.
माझा “निर्माल्य औषध” हा लेख छापून आल्यावर बरेच जणांना मी शेवंतीच्या फुलांच्या पासून केलेली साखर दिली व त्यांना फायदा झाला काहींना साखरेने थोडासा गुण आला. त्यांना शेवंतीच्या पाकळ्या सुकवून केलेल्या गोळ्या दिल्यावर खूपच छान गुण आला.
निसर्ग देवता किती दयाळू व माणसाची काळजी घेणारी आहे. अश्विन व कार्तिकात पित्त वाढते. त्या दिवसात भरपूर शेवंती येते. आमचे पूर्वजांना शेवंतीची हा उपयोग माहिती असावा म्हणून नवरात्र,लक्ष्मीपूजनाला शेवंती आवश्यक अशी प्रथा पाडली.
जे देवाला ते माणसाला.
शेवंतीचे माझ्या संशोधनात आलेले काही गुण खालील आजारावर लागू पडते .
यकृत सूज, कोलायटिस, संडासला खडा, मधुमेह, गॅसेस अडकणे, दमा कोरडा, डोक्यात मुंग्या येणे, रेटिना, अर्धांगवायू, लठ्ठपणा वाढणे, उष्माघात, धनुर्वात, मूत्रपिण्ड काम न करणे, लघवीला आग,किडणी स्टोन.
ह्या आजारांवर मी अजून वापरलेले नाही.
ज्याना ते त्रास असतील त्यानी वापरून मला त्याचे अनुभव कळवावेत ही विनंती.
— अरविंद जोशी
९४२१९४८८९४
शेवंतीच्या ह्या गुणधर्माना आयुर्वेदिक ग्रंथाधार आहे का नाही हे मला माहिती नाही. माझे काम अनुभव घेणै व सांगणे हे आहे.
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
Leave a Reply