अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक रजत कपूर यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९६१ नवी दिल्ली येथे झाला.
रजत कपूर हे प्रामुख्याने ग्लॅमरस बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचा चेहरा म्हणून ओळखला जातो. रजत कपूर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे.
रजत यांचा लहानपणापासूनच अभिनयाकडे कल होता.रजत कपूर यांनी दिल्लीतून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. छंदासाठी ते पहिल्यांदा रंगभूमीवर आले. यानंतर त्यांनी अभिनयातील बारकावे शिकण्यासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला.
रजतने आपल्या करिअरची सुरुवात मंडी या चित्रपटातून केली होती. यानंतर त्यांनी व्यावसायिक आणि समांतर सिनेमांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
रजत कमी बजेट असलेल्या अशा लोकप्रिय चित्रपटांचा एक भाग बनला. त्यांचे चित्रपट विनोदी आणि मुद्द्यावर आधारित होते, ज्यांचे समीक्षकांनीही खूप कौतुक केले. १९८३ मध्ये ‘मंडी’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. रजत कपूर यांनी प्रामुख्याने ‘मानसून वेडिंग’,‘भेजा फ़्राय’,‘एजेंट विनोद’, ‘किसना’,‘कॉर्पोरेट’,‘ये क्यों होता है’,‘दृश्यम’,‘मिडनाईट चिल्ड्रेन’,‘कपूर एंड सन्स’,‘मुल्क’असे अनेक चित्रपट दिले आहेत.
रजत कपूर यांनी दिग्दिर्शीत पहिला चित्रपट ‘रघु रोमियो’ होता. या चित्रपटाबद्दल एक किस्सा असाही आहे की हा चित्रपट बनवण्यासाठी रजत यांनी पैशासाठी आपल्या सर्व मित्रांना ई-मेल पाठवेले होते. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी ई-मेलद्वारे जमा केलेले पैसे परत करायला त्यांना तीन वर्षांहून अधिक काळ लागला. दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र, या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
चित्रपटांसोबतच रजत ओटीटी प्लॅटफॉर्मवरही दिसतात.’स्कॅम 92′ या वेब सिरीजमध्ये त्यांनी केलेली के. माधवन ही व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली होती. रजत यांनी १९९६ मध्ये मीनल अग्रवालशी लग्न केले. या दोघांना एक मुलगी राबिया कपूर आणि मुलगा विवान कपूर आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply