गजानन जागीरदार यांचा जन्म २ एप्रिल १९०७ रोजी अमरावती येथे झाला. त्यांचे वडील जनार्दन जागीरदार हे शिक्षक असल्यामुळे गजानन जागीरदार यांनाही शिक्षणाची आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमरावती , कानपुर , बनारस येथील शाळांमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्युसन म्हवादियालयात प्रवेश घेतला. शिकत असतानाच गजानन जागीरदार लेखन , नाटकात काम करीत असत. बी. ए . कॅजी पदवी मिळाल्यानंतर १९३० मध्ये त्यांनी कोल्हापूर येथे शिक्षकी पेशा स्वीकारला.
नोकरी करत असतानाच त्यांनी मूकचित्रपटांना शीर्षके लिहिण्याचे काम प्रभात कंपनीमध्ये करू लागले हे काम त्यांना बाबुराव पेंढारकर यांनी त्यांना दिले, आणि अशा तऱ्हेने गजानन जागीरदार यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्याचवेळी भालजी पेंढारकर बाबूराव पेंढारकर यांच्या कंपनीमध्ये ‘ राणी रूपमती ‘ दिग्दर्शित करत होते. त्यावेळी गजानन जागीरदार यांना पेंढारकरांचे सहाय्यक दिग्दर्शक केले.
त्यानंतर पुढे इंग्रजीतून पत्रव्यवहार करणे , वृत्तपत्रांना पाठवण्यासाठी वार्तापत्र आणि शांतारामबापूंना दिग्दर्शनात मदत करणे यासाठी प्रभात फिल्म कंपनीमध्ये गजानन जागीरदार याना चाळीस रुपये पगारावर नोकरीस ठेवण्यात आले. त्यांनी तेथे ‘ अग्निकंकण ‘ या मराठी चित्रपटात आणि ‘ जलती निशानी ‘ या हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. १९३४-३५ मध्ये कोल्हापूर येथे शाम मुव्हीटोन नावाची चित्रपटसंस्था झाली. तेथे ‘ पार्थकुमार ‘ या नावाचा हिंदी आणि मराठी चित्रपट भालजी पेंढारकर यांच्या दिगदर्शनाखाली होत होते , काही कारणाने भालजी पेंढारकर यांनी तो चित्रपट सोडला त्यामुळे श्याम सिनेटोनच्या निर्मात्यांनी हे चित्रपट गजानन जागीरदार यांना दिग्दर्शिन करण्यास सांगितले . अशा तऱ्हेने गजानन जागीरदार दिग्दर्शन करू लागले.
त्यानंतर त्यांनी १९३४ साली ‘ सिहासन ‘ आणि १९३६ साली ‘ होनहार ‘ हे दोन चित्रपट केले आणि त्यात कामही केले. ह्या दोन चित्रपटांमुळे गजानन जागीरदार यांचे नाव खूप झाले. मिनर्व्हा मुव्हिटोनच्या सोहराब मोदी यांनी त्यांना त्यांच्याकडे बोलावूं घेतले. त्या कंपनीत ते तीन वर्ष होते. तेथे त्यांनी ‘ मै हारी ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन तर केलेच आणि अभिनयही केला. १९४० साली त्यांना ‘ प्रभात कंपनीने त्यांना परत बोलवले आणि त्यांना ‘ शेजारी ‘ मराठी मध्ये तर तोच चित्रपट हिंदी मध्ये ‘ पडोसी ‘ ह्या चित्रपटात भूमिका दिल्या. या दोन्ही चित्रपटात गजानन जागीरदार यांनी ‘ मिर्झा ‘ या मुस्लिम शेजाऱ्याची भूमिका केली आणि ती इतके जबरदस्त झाली की त्याची चर्चा संपूर्ण देशात झाली. ह्या भूमिकेसाठी त्यांना ‘ बेंगॉल फिल्म्स जर्नलिस्ट असोशिएशनतर्फे १९४१ मध्ये पारितोषिक दिले गेले. त्यानंतर त्यांनी ‘ अत्रे पिक्चर्स ‘ सती पायाची दासी आणि वसंतसेना हे दोन चित्रपट केले आणि ते परत प्रभात फिल्म कंपनीमध्ये आले. ‘ प्रभात ‘ फिल्म्स कंपनीमध्ये त्यांनी ‘ रामशास्त्री ‘ हा चित्रपट केला आणि त्यात ‘ रामशास्त्री ‘ यांची प्रमुख भूमिका केली आणि तो चित्रपट खूप गाजला. ह्या चित्रपटासाठी पुन्हा ‘ बेंगॉल फिल्म्स जर्नलिस्ट असोशिएशनतर्फे पुन्हा सर्वोत्तम दिग्दर्शक म्ह्णून गौरवले.
गजानन जागीरदार यांनी ‘ बेहराम खं आणि ‘ उमाजी नाईक ‘ ह्याप्रमाणे अनेक हिंदी मराठी चित्रपट केले आणि त्यात कामेही केली. १९६० मध्ये पुण्यात फिल्म्स इन्स्टिटयूट स्थापन झाली तेव्हा त्या संस्थेत पाहिले प्राचार्य म्ह्णून त्यांची नेमणूक झाली. काही वर्षे त्यांनी प्राचार्यपद सांभाळले आणि परत चित्रपटक्षेत्रात आले. त्यांनी ‘ वैजयंता ‘ हा मराठी चित्रपट केला होता.त्यात त्यांनी दिग्दर्शन , निर्मिती आणि भूमिका ह्या तिन्ही भूमिका सांभाळल्या. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले होते. त्यानंतर त्याना ‘ शाहीर परशुराम ‘ या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले होते.
त्यांचा ‘ छोटा जवान ‘ हा चित्रपट खूप गाजला, त्यावेळी तो चित्रपटगृहात दाखवला गेलाच परंतु शाळाशाळांतून दाखवला जात असे. त्या चित्रपटासाठी त्यांना ‘मी विशेष अभिनेता ‘ म्ह्णून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या ‘ दोन्ही घरचा पाहुणा ‘ या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा बहुमान मिळाला. त्यांनी काजल , सुरज, आ गले लग जा , आम्रपाली , उमराव जण , कर्मयोगी , देस परदेस आणि १९७५ साली त्यांचे दोन चित्रपट आले दफा ३०२ आणि मुठ्ठी भर चावल अशा सुमारे ५३ चित्रपटातून भूमिका केल्या.
१९८१ मध्ये भारतीय बोलपटांच्या सुवर्णजयंती महोत्सवात त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी ‘ संध्याकाळ ‘ , पाऊलखुणा ‘ ही दोन आत्मचरित्रे लिहिली त्याचप्रमाणे ‘ अभिनय कसा करावा आणि ‘ द मॅजिक सर्कल ‘ अशी ऐकून चार पुस्तके लिहिली. त्यांनी नऊ चित्रपट दिग्दर्शित केले .
१३ ऑगस्ट १९८८ रोजी त्यांचे मुबंईत वृद्धपकाळामुळे त्यांचे निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply