जीवन यांचे खरे नाव ओंकार नाथ धर, जीवन हे नाव त्यांना विजय भट यांनी दिले. ते काश्मिरी पंडित. त्यांना एकूण २४ भाऊ बहिणी होत्या असे म्हटले जाते. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९१५ रोजी झाला.
अभिनय करण्यासाठी ते घरातून २६ रुपये घेऊन वयाच्या १८ व्या वर्षी मुंबईत आले. पहिले काम डायरेक्टर मोहनलाल सिन्हा यांच्या स्टूडियो मध्ये काम मिळाले. मोहनलाल यांनी जीवन यांना आपला चित्रपट ‘फैशनेबल इंडिया’ मध्ये काम दिले. जीवन यांनी जवळपास ६० चित्रपटात नारद मुनीचा अभिनय केला आहे. आपल्या नारद मुनी रोल बद्दल एकदा जीवन म्हणाले होते, स्वर्गातून नारद मुनी स्वत: आले तर आणि मला बघितले तर ते स्वत:ला डुप्लिकेट मानतील. आपल्या करियरच्या सुरवातीला जीवन यांनी खूप स्ट्रगल केला. जीवन यांना १९३५ साली आलेल्या ‘रोमांटिक इंडिया’ या चित्रपटातून एंट्री मिळाली. त्यांनी ‘सुहाग’, ‘नसीब’, ‘चाचा भतीजा’, अफसाना’, ‘स्टेशन मास्टर’, ‘अमर अकबर एंथनी, नागिन, शबनम, हीर-रांझा, जॉनी मेरा नाम, ‘धरम-वीर’ अशा चित्रपटात कामे केली. जीवन यांनी ६० ते ८० च्या दशकात अनेक चित्रपटात चरित्र अभिनेत्याची कामे केली. जरी त्यांनी व्हिलन ची कामे केली, त्यात त्यांनी विनोदी भाव आण्याचे प्रयत्न केले.
जेष्ठ अभिनेते किरण कुमार हे जीवन यांचे चिरंजीव. किरण कुमार यांनीही अनेक चित्रपटात काम केले आहे. जसे की, ‘लव इन शिमला’, ‘आजाद मोहब्बत’, ‘पंडित और पठान’, ‘कालिया’, ‘औजार’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘बेनाम’, ‘बॉबी जासूस’, ‘ब्रदर्स’.
जीवन यांचे १० जून १९८७ रोजी निधन झाले.
Leave a Reply