अभिनेते अनुपकुमार यांचा जन्म २६ जानेवारी १९२६ रोजी मध्य प्रदेशातील खांडवा येथे झाला.
अनूप कुमार यांनी १९५० साली आलेल्या ‘गौना’ चित्रपटात अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार आणि धाकटा भाऊ किशोर कुमार होत. तीन भावांच्यापैकी केवळ अनुप कुमार यांनीच संगीताचा अभ्यास केला होता आणि किशोर कुमार यांच्या आधी ते योडलिंग शिकले होते.
किशोर कुमार आपल्या गाण्यांमध्ये योडलिंगसाठी (गाण्यांमध्ये वेगवान चढउतार) म्हणून ओळखले जातात, या गुणवत्तेमुळे किशोर कुमार वेगळे दिसले. योडलिंग प्रथम अनूप कुमार यांनी त्यांना शिकवले होते. ‘देख कबीरा रोया’, ‘चलती का नाम गाडी’, ‘प्रेम पुजारी’, ‘अमर प्रेम’ अशा अनेक चित्रपटांत काम करूनही ते त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार आणि धाकटा भाऊ किशोर कुमार यांच्या इतके लोकप्रिय झाले नाहीत.
अनूप कुमार यांचे २० सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply