मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल हे आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे झाला. मोतीलाल यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर मोतीलाल मुंबईला नौसेनेत जाण्यासाठी आले होते. पण काही कारणाने ते झाले नाही व हिंदी चित्रपट सृष्टीला एक भारदस्त नट मिळाला.
१९३४ मध्ये सागर फिल्म कंपनीच्या शहर का जादू या चित्रपटात नायक म्हणून पहिले काम केले. मोतीलाल यांचे गाजलेले चित्रपट ‘शादी’, आई-‘परदेसी’, ,’अरमान’, ‘ससुराल’, ‘मूर्ति’, ‘देवदास’, जागते रहो व अछूत कन्या. मोतीलाल यांचे जागते रहो मधील गाणे ‘ज़िंदगी ख्वाब है’ हे गाणे त्या काळी खूपच गाजले होते. मोतीलाल यांचे १७ जून १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
‘ज़िंदगी ख्वाब है’ हे गाणे
https://www.youtube.com/watch?v=GQZaG5SZRYk
Leave a Reply