मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणार नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर.
सचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित गीत गाता चल या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या.
त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले. आपल्या कारकिर्दीत सचिननं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळींबरोबर काम केलं आहे. सचिन उर्दू भाषा आणि उच्चार शिकला थेट मीनाकुमारी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीकडून. अक्षरश- एखाद्या मुलाची शिकवणी घ्यावी तशी मीनाकुमारी यांनी सचिनची शिकवणी घेतली. हिंदी चित्रपटसृष्टीतील देव आनंद आणि विजय आनंद यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडून सचिनला खूप काही शिकायला मिळालं; तर “बैराग‘च्या निमित्तानं दिलीपकुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. संजीवकुमार यांच्याबरोबरचा त्याचा स्नेह घट्ट होता अमिताभ बच्चन यांच्याबोरबर त्यानं दोन-तीन चित्रपटात काम केलं. सचिन यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा चित्रपट “अष्टविनायक‘ या चित्रपटात सचिनची भूमिका नास्तिक माणसाची आणि नायिका वंदना पंडित यांची भूमिका आस्तिक अशी होती. प्रत्यक्ष जीवनात बरोबर उलटं होतं. वंदना अगदी नास्तिक आणि सचिन आस्तिक आहेत.
त्यांनी ”हाच माझा मार्ग” नावाने आपली आत्मकथा लिहिली आहे. सचिन यांनी आपली पत्नी सुप्रियाच्या साथीत नच बलिये पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
साहेब, तुम्ही लिहिलेली सचिन पिळगावकर सरांची जन्मतारिख चुकीची आहे अशी माहिती समोर येतेय. जरा खात्री करुन घ्यावी.