संजय जोग यांचा जन्म २४ सप्टेंबर १९५५ रोजी झाला.
संजय जोग यांचे वडील मुकूंद जोग आणि आजोबा नाना जोग यांनी दोघांनीही मराठी रंगभूमीला आपले योगदान दिले होते. संजय यांनी देखील आपल्या कुटुंबियांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. रामायण या मालिकेत आपल्याला भरतच्या भूमिकेत एक मराठी चेहरा पाहायला मिळाला होता. या मालिकेत भरतची भूमिका अभिनेता संजय जोग यांनी साकारली होती.संजय यांनी रामायणा सोबतच नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात काम केले होते. त्यांनी मराठीसोबतच जिगरवाला, हमशकल या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांनी खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही भरत या व्यक्तिरेखेमुळेच मिळाली. त्यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा देखील अभिनयक्षेत्रात असून जोग कुटुंबियांची चौथी पिढी आता या क्षेत्रात काम करत आहे.
संजय जोग यांचे निधन २७ नोव्हेंबर १९९५ रोजी झाले.
Leave a Reply