अभिनेते सुमीत राघवन यांचा जन्म २२ एप्रिल १९७१ रोजी मुंबई येथे झाला.
वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीपासून सुमीत राघवन अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. सुरुवातीला बालकलाकार म्हणून त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले. ३० वर्षं सुमीत मराठी रंगभूमीवर काम करत आहेत. त्यांनी एक कसदार अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुमीत यांनी मराठी, हिंदी चित्रपट, मालिका यांमध्ये आजवर दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्यासोबतच ‘महाभारत’, ‘तू तू मैं मैं’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, वागळे की दुनिया यांसारख्या मालिकांमध्ये सुमीत राघवन यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांच्या भूमिकेत आपल्याला दिसले होते. मराठी नाटकं, सिनेमांसोबतच हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये सुमीत राघवन यांनी स्वतःची वेगळी छाप सोडली आहे.
सुमीत राघवन एक उत्कृष्ट गायक देखील आहेत. शास्त्रीय संगीताचे त्यांनी धडे गिरवले आहेत. व्हॉइस आर्टिस्ट, होस्ट म्हणूनही ते कार्यरत आहेत. सुमीत यांचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड असल्याने त्याला अनेक लाखांहून लोक इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर फॉलो करतात आणि ते देखील त्याच्या चाहत्यांसाठी त्याचे विविध फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
१९९६ मध्ये अभिनेत्री चिन्मयी सुर्वे यांच्या सोबत सुमीत राघवन यांनी लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नीरद हे त्यांच्या मुलाचे तर दीया हे मुलीचे नाव आहे. नीरद ग्रॅज्युएट असून पिआनिस्ट म्हणून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संगीतकार म्हणूनही तो नाव कमावत आहे. दीयाला देखील वडिलांप्रमाणे गाण्याची आवड असून तिने संगीताचे धडे घेतले आहेत. तिला फोटोग्राफीची विशेष आवड असून भविष्यात सिनेमॅटोग्राफर व्हायचे तिचे स्वप्न आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply