नवीन लेखन...

अभिनेता सुशांतसिंह राजपुत

अभिनेता सुशांतसिंह राजपुत जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी पटणा, बिहार येथे झाला.

एम एस धोनी चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणाऱ्या सुशांत सिंह राजपूत हा बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता होता. सुशांतचे वडील सरकारी अधिकारी आहेत. त्याचं कुटुंब २००० च्या सुरुवातीला दिल्लीला स्थायिक झालं होतं. त्याचं सुरुवातीचं शिक्षण सेंट कॅरेंस हायस्कूल पाटणामध्ये झालं तर नंतर दिल्लीच्या कुलाची हंसराज मॉडेल स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले. दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमधून त्यानं मॅकेनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.

इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना सुशांतने शामक दावरकडे नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. २००६ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याला ऐश्वर्या रायसोबत नृत्य करण्याची संधी मिळाली होती. मुंबईमध्ये नादिरा बब्बरसोबत अभिनयाच्या क्षेत्रात काम करुन एलन-अमीनकडून तो काही ॲ‍क्शन शिकला. यावेळी एका नाटकाच्यावेळी एकता कपूर त्याठिकाणी उपस्थित होती. तिने त्याच्या टॅलेंटला हेरले आणि त्याचे नशीबच बदलले. त्यानंतर ‘पवित्र रिश्ता’मधून त्याने आपल्या छोट्या पडद्यावरील अभिनयाला सुरुवात केली आणि ‘झलक दिख ला जा’ मध्येही आपल्यातील चमक दाखवून दिली होती. स्टार प्लसवरील ‘किस देश मै हे मेरा दिल’ ही त्याची पहिली सिरीअल. त्यानंतर जवळपास तीन वर्षं त्याने झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या कार्यक्रमात काम केले. यात त्याने मानव ची भूमिका साकारली होती.

२०१३ मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्म फेअर ॲ‍वार्ड फॉर बेस्ट मेल डेब्युटसाठी नामांकन मिळालं. त्याने सर्वाधिक गल्ला गमावणाऱ्या आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या पीके चित्रपटात देखील काम केलं. या चित्रपटात त्याने सहाय्यक कलाकाराची भूमिका केली. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले. एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. या चित्रपटाच्या निमित्ताने सुशांत आणि धोनी एकमेकांचे चांगले मित्र बनले होते. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांचा शेवटचा केदारनाथ चित्रपटात तो सारा अली खान सोबत दिसला होता. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ड्राईव्ह हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. दिल बेचारा या चित्रपटाचं शूटिंग लॉकडाऊनमुळे थांबलं होतं.

अंकिता लोखंडेसोबत त्याची पवित्र रिश्तामध्ये अतिशय चांगली केमिस्ट्री जुळली होती. हीच केमिस्ट्री प्रत्यक्ष आयुष्यातही जुळत होती. मात्र कालांतराने त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागले आणि या वादांची जागा ब्रेक-ॲ‍पने घेतली. त्यानंतर त्याने समोर येत माध्यमांना याबाबतचे स्पष्टकरणही दिले होते.

सुशांतसिंह राजपुत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..