जन्म. २२ एप्रिल १९८५ मुंबई येथे.
सुव्रत जोशीच्या घरी नाटक आणि चित्रपट बघण्याचं वातवरण होत. त्याचे वडील पत्रकार होते. शिवाय, ते चित्रपटांसाठी लिखाणही करायचे. त्यामुळे लहानपणापासूनच ते अनेक नाटकं आणि सिनेमा बघायला घेऊन जायचे. म्हणून अगदी सुव्रतला लहानपणापासूनच या संपूर्ण माध्यमाविषयी खूप आवड आणि कुतूहलही होत. या आवडीपोटी शाळेत असल्यापासूनच त्याने नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया अशा विविध कॅम्पस थिएटरची परंपरा असलेल्या स्पर्धांच्या निमित्ताने विविध एकांकिका आणि नाटकांमध्ये त्याने सातत्याने काम केले. अखेर कॉलेजच्या संपूर्ण पाच वर्षाच्या प्रवासात आपण फक्त आणि फक्त ‘नाटकं’चं केल्याचं लक्षात आलं आणि म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
पुणे विद्यापीठातून पदवी घेतल्यावर त्याने एका प्रख्यात शाळेत एक वर्ष शिक्षकाची नोकरी केली, पण त्याचे खरे वेड अभिनय हेच होते. त्यामुळे त्याने पुढील शिक्षणासाठी दिल्लीत एनएसडीमध्ये प्रवेश मिळवला. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही अनेक वर्ष सुव्रत जोशीने दिल्लीत नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘किंगडम ऑफ ड्रीम्स’ या थिएटरच्या एका नाटकात त्याला मुख्य भूमिका मिळाली आणि तिचं त्याच्या पहिल्या व्यावसाईक कामाची सुरुवात होती. नॉट इन फोकस, बिनकामाचे संवाद, ड्रीम्स ऑफ तालीम आणि अमर फोटो स्टुडीओ ही त्याने केलेली नाटके.
सुव्रत जोशीने अभिनेत्री सखी गोखलेशी लग्न केले आहे. ‘दिल दोस्तीच्या…’सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply