अभिनेता टॉम हॉलंड यांचा जन्म १ जून १९९६ रोजी लंडन येथे झाला.
थॉमस स्टैनली हॉलड हे टॉम हॉलडचे खरे नाव. त्याचे शिक्षण लंडन येथील डॉनहेड प्रिपरेटरी स्कूल, विंबलडन कॉलेज, बीआरआईटी स्कूल ऑफ परफार्मिंग आर्ट्स येथे झाले. सपासप जाळे विणून या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवर उडणारा स्पायडर मॅन बच्चे कंपनीचा जबरदस्त फेव्हरेट आहे. हा पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेला स्पायडर मॅन साकारण्याची संधी टॉम हॉलडला मिळाली. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स फिल्म्सचा काल्पनिक सुपरहिरो, स्पायडर मॅनची भूमिका साकारणारा टॉम हॉलडला कधी-कधी स्पायडर मॅनचा ड्रेस खूपच त्रासदायक वाटतो.
एका मुलाखती तो म्हणतो स्पायडर मॅनचा ड्रेस घालणे सुरुवातीला फारच मजेशीर वाटत होते. नंतर तो फारच त्रासदायक वाटायला लागला. आपण स्पायडर मॅनची भूमिका साकारत असल्याचा जेव्हा विचार मनात येत होता, तेव्हा मात्र मी स्वत:ला भाग्यशाली समजत होतो. कारण हा ड्रेस घालण्यासाठी हॉलिवूडमध्ये कलाकारांची अक्षरश: रिघ लागलेली आहे. त्यामुळे कितीही त्रास झाला तरी, मी ही भूमिका करतो.
बिली इलियट द म्युझिकल (२०१२) या स्टेज शोमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्या अन्य चित्रपटांमध्ये द इम्पॉसिबल (२०१२), इन हार्ट ऑफ सी (२०१५) आणि द लॉस्ट सिटी ऑफ जी (२०१६) यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये त्याला बीएएफटीए राइजिंग स्टार पुरस्काराने गौरविण्यात आले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply