अभिनेते उदय टिकेकर यांचा जन्म ४ डिसेंबर १९६५ रोजी झाला.
मराठी-हिंदी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर प्रभावी करणाऱ्या कलाकारांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे उदय टिकेकर. अभिनयात कारकीर्द घडविणाऱ्या उदय टिकेकर यांना आई-वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला होता. उदय टिकेकर यांचे वडील बाळासाहेब टिकेकर हे ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक तर सुमती टिकेकर ह्या जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका होत. बहीण उषा देशपांडे ह्या पं. फिरोज दस्तूर यांच्या शिष्या. मात्र घराण्यात गायन असूनही उदय टिकेकर यांनी अभिनयाची वाट जोपासली. अभिनेता म्हणून ‘धाकटी सून’ हा उदय टिकेकर यांचा पहिला चित्रपट होय. पुढे ‘आव्हान’ मालिकेतील खलनायकी भूमिकेमुळे ते घराघरांमध्ये पोचले. ‘सातच्या आत घरात’, ‘भय’, ‘दुनियादारी’, ‘खो खो’, ‘सतरंगी रे’, ‘अर्जुन’, ‘गुलदस्ता’, ‘साडे माडे तीन’, ‘इश्य’, ‘शुभमंगल सावधान’, ‘फेकाफेकी’, ‘इश्य’, ‘लई भारी’ हे त्यांचे काही महत्त्वाचे मराठी चित्रपट. उदय टिकेकर यांनी ‘शमिताभ’, ‘बर्फी’, ‘रईस’, ‘लाल सलाम’ या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं आहे. ‘तुझा माझा ब्रेक अप’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘कोई अपना सा’, ‘कसौटी जिंदगी की’ या मराठी-हिंदी मालिकेत उदय टिकेकर यांनी काम केले आहे. उदय टिकेकर यांच्या पत्नी म्हणजे शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर. व कन्या स्वानंदी या तशी आधीपासूनच म्हणजे कॉलेज जीवनातूनच अभिनयाशी जुळलेल्या आहेत. पुरूषोत्तम आणि फिरोदीया करंडक सारख्या स्पर्धांमध्ये स्वानंदी यांनी सहभाग घेतला आहे. एक शून्य तीन हे त्यांचे नाटक रंगभूमीवर गाजले होते. स्वानंदी टिकेकर यांनी झी मराठीवरील लोकप्रिय दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत अभिनय केला होता. स्वानंदी दिल दोस्ती दुनियादारी मालिकेनंतर झी युवा वाहिनीवर प्रसारीत झालेली मालिका गुलमोहर मधून रसिकांच्या भेटीला आली होती.
मराठी मालिकेमध्ये काम करत असतानाच स्वानंदीने मराठी नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे. Don’t worry be happy हे त्यांचे नाटक विशेष करून खूप गाजले. या नाटकामध्ये ती उमेश कामत सोबत काम दिसली होती.
स्वानंदी टिकेकर ही सोनी मराठी वरील सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या शोमध्ये सहभागी झाली होती.
स्वानंदीची आई आरती अंकलीकर टीकेकर या प्रख्यात शास्त्रीय गायिका असल्याने अभिनयाबरोबरच स्वानंदीला गाण्याची उत्तम जाण आहे. त्यामुळेच तिने सिंगीग स्टार या म्युझिकल रिॲलिटी कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply