मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेता यतीन कार्येकर यांचा जन्म १ जुलै १९६६ रोजी झाला. यतीन कार्येकर हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं नाव आहे. यतीन कार्येकर हे मराठीतील जेष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर यांचे सुपुत्र आहेत.
त्यांची आई डॉ. ज्योत्स्ना कार्येकर म्हणजे मराठी रंगभूमीच्या मागील चाळीस वर्षांच्या इतिहासात महत्वाची भूमिका बजावणार्या कामेरकर भगिनींपैकी एक. सुलभा देशपांडे, प्रेमा साखरदांडे यांचा तो सख्खा भाचा.१९७२ सालापासून म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षापासून यतीन कार्येकर हे रंगभूमी, दूरदर्शन, चित्रपट अशा माध्यमांशी जोडले गेले. पंडित सत्यदेव दुबे, जयदेव हट्टंगडी, कमलाकर सारंग, रत्नाकर मतकरी, सई परांजपे, विनायक चासकर यासारख्या रंगकर्मींचे यतीनवर तेव्हापासून संस्कार झालेले होते. त्यामुळे त्यांच्या अभिनयातले बारकावे, कंगोरे घासून पुसून तयार झालेले होते. मकरंद देशपांडे, आशुतोष गोवारीकर हे यतीन कार्येकर यांचे तेव्हापासूनचे दोस्त.
मुन्नाभाई एम् बी बी एस् मधील त्यांची आनंद भाईची भूमिका खुप प्रसिद्ध झाली होती. “राजा शिव छत्रपती” या मालिकेत त्यांनी औरंगजेबची भूमिका केली आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका केल्या आहेत, तसेच त्यांनी साठहून अधिक चित्रपटात अभिनय केला आहे.
काही दिवसांपूर्वी मराठीसृष्टीच्या टीमने त्यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीच्या भागांच्या लिंक्स खाली देत आहे.
भाग १: https://www.marathisrushti.com/mstv/actor-yateen-karyekar-part-1/
भाग २: https://www.marathisrushti.com/mstv/actor-yateen-karyekar-part-2/
भाग ३: https://www.marathisrushti.com/mstv/actor-yateen-karyekar-part-3/
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply