नवीन लेखन...

अभिनेत्री अभिज्ञा भावे

जन्म. १३ मार्च १९८९ वसई येथे.

मायरा, मुक्ता, मोनिका अश्या अनेक विविध छटा असलेल्या भूमिका लिलया पार पाडणारी अभिनेत्री अभिज्ञा भावेने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची अशी एक अनोखी ओळख निर्माण करणारी अभिज्ञा भावे. अभिज्ञा मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिज्ञा भावेने M.A in Sociology पर्यत शिक्षण केले आहे. डी जी रुपारेल कॉलेज येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या अगोदर अभिज्ञा भावे हवाईसुंदरी म्हणून काम करत होती. किंगफिशर एअर लाईन्स मध्ये ‘एअर होस्टेस’ म्हणून कार्यरत होती. २०१० साली महाराष्ट्र टाईम्स कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होऊन ‘श्रावण क्वीन’ची ती फायनलिस्ट बनली.

भूमिका कुठलीही असो आपल्या खास अशा टचने अभिज्ञा प्रत्येक भूमिका आपलीशी करते हे तिचं वैशिष्ट्यच म्हटलं पाहिजे. अभिज्ञा भावे ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली. पुढे ‘देवयानी’, ‘लगोरी’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘कट्टी-बट्टी’ एक मोहोर अबोल या मालिकांमध्ये अभिज्ञाने आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. अभिज्ञा भावेची तुला पाहते रे’ या मालिकेतील मायराची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती.

मुविंग आऊट या वेब सिरीज मधून तिने वेब दुनियेत पदार्पण केलं आणि प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अभिज्ञा भावेच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याचा दुसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला.

२०१२ साली ‘लांगर’ या मराठी चित्रपटामुळे तिला अभिनयाची संधी मिळाली. सूर सपाटा चित्रपटातही तिने महत्त्वाच्या भूमिका केली होती. मराठी मालिकेसोबतच अनेक हिंदी मालिकेतही ती पाहायला मिळाली. लव्ह यु जिंदगी,प्यार की ये एक कहाणी,बडे अच्छे लगते हो,धर्मकन्या यात तिने काम केले.संतोष जुवेकरसोबत तिने ‘लग्नलॉजि’ या नाटकात काम केले.

अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय असून ती नेहमी इंस्टाग्रामवर ग्लॅमरस व एथनिक आऊटफिटमधील फोटो शेअर करत असते. २०१५ पासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोबत अभिज्ञा भावे “तेजाज्ञा” सारखा मोठा डिझाइनर ब्रँड ही चालवतेय. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ह्या डिझाइनर ब्रॅन्डला आपली कधी जाहिरात करायची गरज पडली नाही. २०१४ साली अभिज्ञाने वरुण वैटिकर याच्याशी लग्न केले होते. वरून बरोबर घटस्फोट घेऊन अभिज्ञा भावेने मेहुल पै यांच्या सोबत जानेवारी २०२१ मध्ये लग्न केले आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

नुकतेच अभिज्ञा भावेचे पती मेहुल पै यांना कॅन्सरचं निदान झाल्याचं समोर आल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..