अभिनेत्री व प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांचा जन्म २९ मे १९७७ रोजी पुणे येथे झाला.
शर्वरी जमेनीस यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत. त्याचं शालेय प्राथमिक शिक्षण पुणे येथील अभिनव शाळेत झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण विमलाबाई गरवारे हायस्कूल मध्ये झालं. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण एस..एन.डी.टी. मधुन झालं.
शर्वरी जमेनीस यांनी शाळेत असताना मराठी-हिंदी-संस्कृत नाटकांमधून कामं केली. सांस्कृतिक स्पर्धांमध्येही भाग घेण्यात त्या आघाडीवर होत्या. त्या अवघ्या सात वर्षांच्या असताना त्यांच्या आईने त्यांना गुरु रोहिणी भाटे यांच्या नृत्यभारती कथ्थक नृत्य अकादमी या संस्थेमध्ये दाखल केलं. कुठल्याही संगीताच्या साथीशिवाय त्या तासनतास गोल फिरू शकायच्या ते सगळं पाहून त्यांच्या आईने त्यांना नृत्याचं शास्त्रोक्त शिक्षण द्यायचा निर्णय घेतला आणि अकादमीत दाखल केलं. त्यांच्या बरोबरच्या मुली खेळत असतांना त्या डान्स क्लासला जायच्या. नृत्याच्या पहिल्या तीन परीक्षांचं मार्गदर्शन त्यांना रोहिणीताईंच्या ज्येष्ठ शिष्यांकडून मिळालं. त्यानंतर मात्र त्यांनी थेट रोहिणीताईंकडून नृत्याचे धडे घेतले.
सुरुवातीच्या काळात त्यांना नाट्य वाचन करायला खूप आवडायचं. संस्कृत, मराठी आणि इंग्रजी तीनही भाषांमध्ये त्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्या भाग घ्यायच्या. महाविद्यालयात असतांना त्यांनी अनेक नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि पारितोषिके देखील मिळवली. अशाच अनेक स्पर्धांपैकी एका स्पर्धेचे परीक्षक म्हणून चंद्रकांत कुलकर्णी आले होते. त्यांनी त्यांचा अभिनय पाहिला आणि बिनधास्त चित्रपटासाठी विचारले. ह्या चित्रपटामुळे त्यांची अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. चित्रपटासाठी त्यांना व्हिडिओकॉन स्क्रीन आणि फिल्मफेअरची अभिनयाची पारितोषिके मिळाली. पण त्यांचा पहिला चित्रपट मात्र ‘सरकारनामा’ हा होय. १९९९ मधील चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘बिनधास्त’ चित्रपटानं तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटामधील ‘वैजयंता’ ही भूमिका गाजली. ‘मायबाप’, ‘पाश’, ‘कायद्याचं बोला’, ‘सरकारनामा’, ‘मिशन चॅम्पियन’, ‘सावरखेड एक गाव’ हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट. त्यांनी अमोल पालेकर ह्यांच्या ‘पहेली’ ह्या चित्रपटात देखील काम केले आहे. ‘पिंपळपान’, ‘भटकंती’ आणि ‘पेशवाई’ या त्यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिका आहेत. शर्वरी जमेनीस या स्वतः नृत्य सादर करता करता करीयोग्राफी देखील करतात. ‘पाश’ ह्या चित्रपटासाठी त्यांनी नृत्य संरचना केली आहे. गजेंद्र अहिरे ह्यांच्या ‘बयो’ ह्या चित्रपटासाठी त्यांनी नृत्यसंरचना केली आहे. मायबाप आणि पाश या चित्रपटाचे तिने कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे. त्या व्हिडिओ अल्बम साठी देखील संरचना करत आहेत. शर्वरी जमेनीस ह्या फक्त कथ्थकच करतात असं नाही,तर त्या ‘चाचाच्या,’जारव्ह’ आणि ‘बॉलरूमडान्स’ही करतात. तिने एरोबिक इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम पाहिले आहे. नृत्यामध्ये त्यांचा आदर्श आहेत त्यांच्या ‘गुरु पंडिता रोहिणी भाटे’. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचं श्रेयही त्या त्यांच्या गुरुंना देतात. २०१० मध्ये त्यांनी निखिल फाटक या प्रसिद्ध तबलावादक सोबत लग्न केले. त्या दोघांना शारविल नावाचा मुलगा आहे. शर्वरी ज्या अकादमीत नृत्याचे प्रशिक्षण घेत होत्या तेथेच निखिल फाटक तबला वादक म्हणून कार्यरत होते तेथेच त्यांची मैत्री झाली व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
निखिलने तबला विषयात एमए ची पदवी प्राप्त केली आहे. एक उत्कृष्ट तबला वादक म्हणून अनेक ठिकाणी परफॉर्मन्स केले आहेत. शर्वरी जमेनीस यांना कलादर्पण, नर्गिस दत्त पुरस्कार आणि अल्फा गौरव पुरस्कार, उस्ताद बिस्मिल्ला खॉं युवा पुरस्कार सिंगारमणी किताब. कलागौरव, पुष्पगौरव, `बिनधास्त` चित्रपटासाठी फिल्मफेअर स्क्रीन बेस्ट अभिनेत्री. `भटकंती` मालिकेसाठी उत्कृष्ट निवेदक सन्मान, २०११ ला आलेल्या `समुद्र` चित्रपटासाठी उत्कृष्ट न्यृत्यदिग्दर्शनाचा राज्य पुरस्कार. सह्याद्री सिने सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले. अभिनयाबरोबरच नृत्य, गायन, नृत्यगीत रचना, लेखन, अशा कलांमध्ये निपुण असलेल्या शर्वरी जमेनीस एक एरोबिक इनस्ट्रक्टर देखील आहेत.
Leave a Reply