अनुष्का शर्माचा जन्म बेंगलोर मध्ये झाला, पण तिचे आई वडील गढवालचे आहेत. वडील कर्नल अजय कुमार शर्मा हे एक आर्मी ऑफीसर आहेत. त्यांचा जन्म १ मे १९८८ रोजी झाला. अनुष्का शर्माचे शिक्षण आर्मी विद्यालय व माउन्ट कारमेल कॉलेज, बेंगलोर येथे झाले. अनुष्का शर्माचा सध्या बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रीमध्ये समावेश झाला आहे. आपल्या विविध भूमिकांमधील चांगल्या अभिनयाने तिने बॉलिवूडमध्ये आपलं हे स्थान निर्माण केलं आहे. अनुष्काने आजवर अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. बॉ़लिवूडच्या ‘किंग खान’सोबत ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिची ‘तानी’ची भूमिका सर्वांनाच आठवत असेल. याच यशराज बॅनरच्या चित्रपटाने तिला स्टारडम मिळवून दिलं. ‘बॅन्ड बाजा बारात’ या सिनेमात यशराज बॅनरने पुन्हा एकदा अनुष्काला संधी दिली. तिच्या अभिनय आणि तिला मिळालेली लोकप्रियतेमुळे यासाठी ती पात्र होती. या सिनेमातील रणवीर सिंह सोबतची ‘श्रुती कक्कर’ची भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा ‘जब तक हे जान’ सिनेमात मुख्य भूमिकेत होते. या रोमॅन्टिक सिनेमात अनुष्का डॉक्युमेंट्रि फिल्ममेकर ‘अकिरा राय’च्या भूमिकेत दिसली होती.
यश चोप्रा यांचा दिग्दर्शित केलेला हा शेवटचा चित्रपट ठरला. नंतर ती राजकुमार हिरानी यांच्या ‘पीके’ सिनेमात अनुष्का मि. परफेक्टमिस्ट अमिर खानसोबत दिसली. कमाईचे उच्चांक गाठलेल्या या सिमेमात अनुष्का पत्रकार ‘जग्गू’च्या भूमिकेत दिसली. चित्रपटतील तिचा छोट्या हेअरकट मधील लूक लोकांनी चांगलाच पंसत केला.NH 10 मधील ‘मिरा’च्या भूमिकेतून अनुष्का शर्मानं आपला एक वेगळा बेंचमार्क सेट केला. NH 10 या सिनेमातूनही अनुष्का पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना इम्प्रेस करण्यात यशस्वी झाली. तिच्या करिअरमधला सर्वात उत्कृष्ट अभिनय तिने या सिनेमात केला. सध्या माध्यगमांमध्येा सर्वांत जास्त0 चर्चित जोडी म्हतणजे विराट कोहली आणि अनुष्का् शर्मा होय.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply