नवीन लेखन...

अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन

अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनचा जन्म २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मुंबईमध्ये झाला.

भाग्यश्री पटवर्धन ही सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याची असून भाग्यश्रीचे पूर्ण नाव श्रीमंत राजकुमारी भाग्यराजे पटवर्धन आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात छोड्या पडद्यावरुन केली होती.१९८७ मध्ये तिने अमोल पालेकर यांच्या ‘कच्ची धूप’ या टीव्ही शो मध्ये काम केले होते.

१९८९ मध्ये भाग्यश्रीने ‘मैने प्यार किया’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मैने प्यार किया या चित्रपटामध्ये भाग्यश्री ने सलमान खानसोबत नायिकेची भूमिका केली होती. मैने प्यार किया प्रदर्शनावेळी भाग्यश्री केवळ १९ वर्षाची होती. मैने प्यार किया या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली. ह्यासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला होता.

भाग्यश्रीने अभिनेता अमोल पालेकर व्दारा निर्मित ‘कच्ची धूप’ या मालिकेतून करिअरला सुरूवात केली होती. ही मालिका दुरदर्शनवर प्रसारित होत होती. सलमान खानसोबतची जोडी लोकांनी डोक्यावर घेतली होती आणि सिनेमासुध्दा बराच गाजला होता. राजश्री प्रोडक्शनचा या सिनेमानंतर भाग्यश्रीने एक-दोन सिनेमातच काम केले आणि बॉलिवूडमधून एक्झिट घेतली. २००९ साली तिने झक मारली बायको केली ह्या मराठी चित्रपटात काम केले.

भाग्यश्रीने नवरा हिमालयसोबत ‘त्यागी’ (१९९२), ‘पायल’ (१९९२) आणि ‘कैद में है बुलबुल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. परंतु हे तिन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉपट ठरले.

१९९३ मध्ये ‘घर आया मेरा परदेशी’ मध्य भाग्यश्रीने काम केले. २००१ मध्ये भाग्यश्रीने पुन्हा एकदा ‘हेल्लो Girls’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला यश मिळाले नाही. अशावेळी तिने भोजपुरी, मराठी आणि तेलुगूमध्ये काम केले.

२०१५ मध्ये भाग्यश्री ‘लौट आओ त्रिशा’ या मालिकेत दिसले. ही मालिका खुप प्रसिध्द झाली. यासोबतच ती ‘झलक दिखला जा’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली.

भाग्यश्रीने बालपणीचा मित्र आणि बिझनेसमन हिमालय दासानीसोबत १९९० मध्ये लग्न केले. या दोघांना अवंतिका आणि अभिमन्यू हे दोन मुलं आहेत.अभिमन्यू दासानी ने २०१९ मध्ये आलेल्या मर्द को दर्द नही होता या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अभिमन्यू शिवाय राधिका मदान, गुलशन देवय्या आणि महेश मांजरेकर यांनी काम केले आहे.

काही दिवसांपूर्वी भाग्यश्री कंगना राणौत अभिनित ‘थलायवी’ चित्रपटात दिसली होती. भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अवंतिका लवकरच रोहन सिप्पीच्या सायकोलॉजिकल थ्रिलर-ड्रामा वेब सीरिज ‘मिथ्या’ मध्ये दिसणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=mB5hKtSo81g

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..