अभिनेत्री मृणाल दुसानिस यांचा जन्म २० जून १९८८ रोजी नाशिक येथे झाला.
मृणाल दुसानिसने नाशिक मधील मराठा हायस्कूल येथून शालेय व H.P.T Arts and R.Y.K Science कॉलेज मधून पत्रकारिका आणि जनसंचार यात उच्च शिक्षण घेतलं. मृणाल दुसानीसने खरोखरच अभिनेत्री असूनही तिचा साधेपणा जपला आहे. तिला आतापर्यंत एकदाही बोल्ड रुपात प्रेक्षकांनी पाहिलेले नाही. तिने जपलेला हा साधेपणा प्रेक्षकांना आपलेसे करुन जातो. मराठी इंडस्ट्रीत सरळ, साधी आणि सोज्जवळ अभिनेत्री अशी मृणालची ओळख निर्माण झाली आहे. तिनं एकता कपूरच्या पहिल्या मराठी मालिकेतून पदार्पण केलं, त्या मालिकेचं नाव होत “माझिया प्रियेला प्रीत कळेना”. त्यानंतर तिने चिन्मय मांडलेकरच्या “तू तिथे मी” ह्या पारिवारिक मालिकेत काम केलं.
केवळ चांगली अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम डान्सरही आहे. झी मराठीवरच्या “एका पेक्षा एक अप्सरा आली” ह्या रिऍलिटी डान्स शो मधेही भाग घेतला. तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या शोमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. रिमोट माझा आणि आम्ही सारे खव्वये मध्ये तिने अँकरिंग हि केलं. मृणाल दुसानीसने ‘रक्तपुष्प’ या नाटकात व श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटातही काम केलय. एबीपी माझा वरील ‘रिमोट माझा’ या शो चे आणि झी मराठी वरील ‘आम्ही सारे खवय्ये’ या कुकिंग शोचे निवेदन मृणालने केले आहे.
कलर्स मराठी वर तिची “अस्सं सासर सुरेख बाई” ही मालिका सुरु होती. लग्न झाल्याने तिने मालिका सोडली. मृणाल दुसानीसचा पती नीरज मोरे सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे आणि त्याचा अमेरिकेत जॉब आहे. मृणाल मालिका विश्वाशी जोडलेली असल्याने तिला काही महिने अमेरिकेत तर काही महिने भारतात वास्तव्य करावं लागतं. सुखांच्या सरीने हे मन बावरे या मालिकेमध्येही आपल्या भूमिकेने मृणालने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply