ज्येष्ठ अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म २ मार्च १९२५ रोजी झाला.
वि.वा.शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती. शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे. ’शांता जोग करंडक’ हा एका नाट्यस्पर्धेत बालनाट्याला दिला जाणारा पुरस्कार आहे. ’महाराष्ट्र नाट्यवर्धक मंडळा’ने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेनंतर विजयी एकांकिकेस ’शांता जोग स्मृती करंडक’ दिला जातो. शांता जोग या जेष्ठ अभिनेते अनंत जोग यांच्या मातोश्री व अभिनेत्री क्षिती जोग यांच्या आजी होत. शांता जोग यांचे आत्मचरित्र ’रंग आणि दंग’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘मंतरलेली चैत्रवेल’, ‘लग्नाची बेडी’, ‘हॅम्लेट’, ‘हिमालयाची सावली’ ही त्यांची गाजलेली नाटके होती. तर ‘आराम हराम आहे’, ‘२२ जून १८९७’, ‘वऱ्हाडी आणि वाजंत्री’, ‘सासुरवास’, ‘उमज पडेल तर’, ‘कलावंत विकणे आहे, ‘या सुखांनो या’, ‘गारंबीचा बापू’, ‘झाकोळ’ हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट होत.
५ एप्रिल १९८० रोजी एका बसमधून जाताना मुंबई-गोवा महामार्गावर बसला आग लागून त्यात शांता जोग, आणि जयराम हर्डीकर व इतर कलावंतांचा शेवट झाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply