सौ. नीलिमा आणि धनश्री प्रधान-दामले
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडयात सौ. धनश्री प्रधान दामले यांचे साम टीव्हीच्या सुगरण या कार्यक्रमात दोन रेसिपीज आमच्या बघण्यात आल्या. रेसिपीज छानच होत्या. पण मनात कुठेतरी प्रधान म्हंटल्यावर मला तुमच्या धनश्रीची आठवण झाली. कारण फेसबुकच्या एका फोटोत तुमच्याबरोबर तिचा फोटो बघितल्यासारखा वाटला पण नक्की आठवत नव्हते म्हणून तुमचा फेसबुक अकौंट उघडून परत एकदा फोटो बघितले आणि लक्षात आले की सामटीव्हीच्या कार्यक्रमात बघितलेली धनश्री ती हीच आहे. तसेच दिनांक २३ आणि २४ जून २०१५ रोजी आपल्या पत्नी सौ.नीलिमा आणि सौ.धनश्री यांची दूरदर्शनच्या ‘माझी माय’ या सदरात झालेली मुलाखत यूट्युबवर प्रथमच पाहिला मिळाली. धनश्रीने आई बद्दलच्या आपल्या शिकवणीचा, जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचे उल्लेख अनेक वेळा केला तेही इतर तरुणाईसाठी खूप आदर्शवत होते. आईनेही आपल्या आदर्शवत मुलीचे खूप कौतुक केले तेही तेवढेच मुलीच्या भावी जीवनासाठी आणि तिने निवडलेल्या ‘निवेदन’ या आपल्या करिअरसाठी उपयुक्तच आहे.
धनश्रीचे बोलणे आणि एखादा विषय समजावून सांगण्याची होतोटी बघून भविष्यात ती तिने निवडलेल्या क्षेत्रात नक्कीच मोठी झेप घेईल असा आम्हांला विश्वास वाटतो. कारण निसर्गातच दैवाने मिळालेलं सौंदर्य, बोलका स्वभाव, विषयाची मांडणी, आई-वडिलांची मिळालेल्या संधीचे सोने करण्याची आदर्शवत शिकवण आणि मराठी भाषेवरील जबरदस्त प्रभुत्व.
एकंदरीत आदर्श आई कशी असावी आणि त्याचा मुलांनी आपल्या जीवनात स्वत:च्या सर्वांगीण विकास आणि उन्नतीसाठी कसा उपयोग करून घ्यावा हे यूट्यूब वरील दूरदर्शनच्या ‘माझी माय’ कार्यक्रम बघून आम्हीं उनुभवावा.
सौ. नीलिमा निनाद प्रधान आणि सौ. धनश्री प्रधान-दामले यांना त्यांच्या भविष्यातील योजनांसाठी आम्हां उभयतांना कडून आणि मराठीसृष्टीच्या लाखो वाचकांकडून अनेकानेक हार्दिक अनिरुद्ध शुभेच्छा…!
जगदीश आणि केतकी पटवर्धन
Leave a Reply