आता सारे भासते अद्भुत
जणु मायाजाल सभोवती
हवे ते आता उपलब्ध सारे
वेदना एक, दुरावली नाती…
आता शोधावी मायाममता
दुर्लभ आता वात्सल्यप्रीती
कुणास कुणाची ओढ़ नाही
वास्तवता ही साऱ्या जगती…
मानवता आज कशा म्हणावे
भासे अद्भुत सारे कल्पनांती…
मरणासाठी कां जगणे असते
हा प्रश्न भेडसावतो विचारांती…
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२४८
२६/९/२०२२
Leave a Reply