अभिनेता अशी ओळख असली तरी त्यांची जाहिरात क्षेत्रातील गुरु म्हणून ख्याती होती. त्यांचा जन्म ५ मार्च १९३१ रोजी झाला. अॅडगुरु असलेल्या पद्मसी यांची भारतातील अव्वल दर्जाची जाहिरात एजन्सी होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रसिद्ध कंपन्यांसाठी जाहिराती बनविल्या.
‘गांधी’ या ऐतिहासिक चित्रपटात मोहम्मद अली जिनाह यांची भूमिका पद्मसी यांनी केली होती.
‘ब्रँड फादर ऑफ इंडियन अॅडव्हर्टायजिंग’ असे त्यांना ओळखले जायचे. ‘सर्फ’, ‘लिरील गर्ल’, ‘चेरिंग ब्लॉसम शु पॉलिश’, ‘हमारा बजाज’, ‘एमआरएफ मसल मॅन’ अशा अनेक प्रसिद्ध जाहिरातींची निर्मिती त्यांनी केली.
जाहिरात क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना २००० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच मुंबईतील अॅडव्हर्टायजिंग क्लबतर्फे ‘अॅडव्हर्टायजिंग मॅन ऑफ द सेंच्युरी’ असे गौरविण्यात आले होते. संगीत नाटक अकादमीतर्फे २०१२ मध्ये टागोर रत्न पुरस्कार दिला होता. अलेक पदमसी यांचे १७ नोव्हेंबर २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply