हात हातात गुंतवूनी, मान खाली दाडवण्यास ,
लटकेच हसूनी गाली, गोड खळी उमटवण्यात…
जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !! १!!
हुरहूर मनाची हळूच, डोळ्यांच्या कोनांत लपवण्यास,
तुफानी धडधड हृदयाची , नकळंत हाताने रोखण्यात…
जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!२!!
जवळ घेण्यात अन् जवळही येण्यास,
भटकंती नजरेची मजभवती भिरभिरण्यात…
जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!३!!
सारूनी बटा हलकेच , हनुवटी वर उचलण्यास,
ओठांवर ओंठ मुरले तरी, डोळे घट्ट बंद करण्यात…
जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!४!!
जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!
— श्वेता संकपाळ
Leave a Reply