‘शोध सर्जनप्रेरणांचा’ हा या वर्षी अंकाचा विषय असून त्याद्वारे दिवंगत तसेच ज्येष्ठ साहित्यिकांच्या निर्मितिप्रक्रियेचा शोध पुढची लिहिती पिढी घेत आहे. समकालात वेधक, वेचक आणि आशययुक्त लिहून आपला स्वतंत्र ठसा उमटवणार्या काही लेखक, कवींना हा लेखन वारसा आपल्या साहित्यिक आई अथवा वडिलांच्या रूपाने घरातूनच थेटपणे लाभला. अगदी हाच धागा पकडत ‘अधोरेखित’च्या या अंकात लेखिका, संपादिका मोनिका गजेंद्रगडकरांचा वडील, ज्येष्ठ कथाकार विद्याधर पुंडलिक यांच्या कथाविश्वाबद्दल, कविवर्य आरती प्रभू यांच्या सर्जनप्रेरणांचा शोध घेणारा कवयित्री हेमांगी प्रभू नेरकरांचा, मॅजेस्टिक प्रकाशनाचे संस्थापक केशवराव कोठावळे यांच्या संपादकीय चष्म्याबद्दल व पुस्तक प्रकाशनाच्या परंपरेविषयी मॅजेस्टिक प्रकाशनचे प्रकाशक अशोकराव कोठावळे यांचा, ‘बलुतं’कार दया पवारांच्या कवितेतील वास्तवतेचा शोध घेणारा कवयित्री, लेखिका प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार असे विविध लेख तर आहेतच पण त्यासोबतच गझलेचं बीज मराठी साहित्यात रूजवणाऱ्या ज्येष्ठ कवी सुरेश भटांच्या गझलेबद्दल चित्तरंजन भट यांचा ‘रंग त्याचा वेगळा’ तसेच ज्येष्ठ कवयित्री, संपादिका प्रभा गणोरकरांच्या सर्जन प्रेरणांचा शोध घेणारा ज्येष्ठ कवी, समीक्षक प्रा. वसंत आबाजी डहाके यांचे अभ्यासपूर्ण लेखन अंकास दस्ताऐवजाचे स्वरूप प्राप्त करून देतात. आपल्या लेखनाची पन्नाशी पूर्ण होऊनही सर्जनाची विविध रूपं नाटकांतून, एकांकिकांमधून, भयकथांतून, कादंबरींतून मांडणारे ज्येष्ठ नाटककार, लेखक रत्नाकर मतकरींच्या सर्जनाच्या अरण्याविषयी त्यांच्या कन्या – लेखिका, अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी केलेले चिंतन अंकात मोलाची भर टाकणारे आहे.
मराठी कवितेचा भक्कम पाया रचणारे ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर यांच्या सर्जनशीलतेचा शोध घेणारा ‘अप्रकाशित बोरकर’ हा साहित्य अकादमी विजेते ज्येष्ठ कोंकणी कवी, अनुवादक माधव बोरकरांचा लेख वाचकांना बोरकरांच्या दप्तरातील आजवर कुठेच प्रकाशित न झालेल्या दूर्मिळ कविता ‘अधोरेखित’च्या स्वरुपात संग्रही ठेवण्याची नामी संधी मिळवून देत आहे.
तसेच चांगदेव काळे, संपदा जोगळेकर कुलकर्णी, निर्मोही फडके, संजय बोरूडे यांच्या सर्जनाविषयीच्या कथा आणि रश्मी वारंग, भारती बिर्जे डिग्गीकर, रेखा नार्वेकर या आणि इतर लेखकांचे ललित व वैचारिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ कवी अशोक बागवे सरांच्या आगामी पुस्तकातील ललित गद्याचा अंशसुद्धा यात समाविष्ट आहे. ‘वाचनाचा बॅकलॉग भरून काढतोय’ ही राज ठाकरे यांची निरूता भाटवडेकरांनी घेतलेली अराजकीय मुलाखतही यावर्षीचे आकर्षण ठरते आहे.
कविता विभागात अरूण म्हात्रे, अशोक कोतवाल, प्रवीण दवणे, अजय कांडर, दिनकर मनवर, प्रशांत असनारे, अनुराधा नेरूरकर, प्रतिभा सराफ यांच्या आणि समकालातील महत्त्वपूर्ण तेरा कवींच्या किमान दोन ते नऊ सर्जनावरील कविता एकत्रित प्रसिद्ध झाल्या आहेत.
आत्ताच खरेदी करा : http://bit.ly/2PcAybZ
गीतेश गजानन शिंदे
(कार्यकारी संपादक)
मो. ९८२०२७२७४६
Leave a Reply