नवीन लेखन...

आधुनिक परंपरेतील दुवा निखळला

ज्यांच्या नावातच विजय आहे ते तेंडुलकर यांनी आपल्या मराठी साहित्यात नाटक, एकांकिका, कथा संग्रह, ललित लेख, संपादन, चारित्र, बालवाड्‌ःमय, भाषांतरीत नाटक – कादंबऱ्या, विनोदी कथा, माहितीपर लेख, वृत्तपत्रीय ललित लेखन इत्यादी विविध साहित्य प्रकारामध्ये आपल्या सिध्दहस्त लेखणीने वादग्रस्त का होईना योगदान दिले आणि आपले वेगळेपण टिकवून ठेवले व त्यात ते विजयी झाले असे हे विजय तेंडुलकर मात्र स्नायुंच्या आजारावर रुग्णालयात उपचार घेताना पराजित झाले.

लौकिकदृष्ट्या विजय तेंडुलकरांचे शिक्षण फारसे झाले नसले तरी आयुष्य जगण्याच्या महाविद्यालयात त्यांनी अनेक प्रकारचे अलुभव घेतले. हे शिक्षण घेत असताना त्यांना माणसातील माणूसपणांचे आणि त्यांच्यातील पशुत्वाचे दर्शन घडले आणि हेच समाजातील वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. समाजाला नाटकातून असे जळजळीत सत्य बघण्याची सवय नसल्यामुळे त्यांची नाटके सतत वादाच्या भोवऱ्यात सापडली. असेही एक नाटक मला जास्त लक्षात राहिले ते म्हणजे “सखाराम बाईंडर” त्या नाटकातील एका दृष्यामुळे सखाराम बाईंडवर बंदी आली. त्या बंदीच्या विरोधात त्या नाटकाचे निर्माते पांडुरंग धुरत व जयसिंग चव्हाण यांनी न्यायालयात यशस्वी झुंज दिली.

ती मी स्वत: फार जवळून पाहिली आहे. कारण पांडुरंग धुरत व त्यांचे पुतणे उदय धुरत हे माझे फार जवळचे स्नेही होते. मी ते नाटक ठाणे शहरात कंत्राटी पध्दतीने आयोजित केले होते. पण दुर्दैव, नाटकाचा प्रयोग ठाण्यात होण्यापूर्वीच त्यावर बंदी आली. कालांतराने न्यायालयात निकाल लागल्यांनतर त्या नाटकावरील बंदी उठविली गेली आणि त्या वादग्रस्त नाटकाचा प्रयोग मी ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या भव्य पटांगणावर आयोजित केला आणि त्याला रसिकांचा प्रतिसादही प्रचंड लाभला. असेच दुसरे एक वादळी ठरलेले नाटक म्हणजे *जिघाडे* अशा या वादग्रस्त नाटकांमुळे मराठी साहित्यक्षेत्रातील सर्वात वादळी व्यक्तिमत्व कोणते असा जर कुणाला प्रश्‍न विचारला तर विजय तेंडूलकरांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागेल. श्रीमंत, शांतेच कार्ट चालू आहे, सखाराम बाईंडर, लालन सारंग, व कमलाकर सारंगचे “कमला* अदविंद देशपांडे दिग्दर्शित “बेबी’, जब्बार पटेल दिग्दर्शित ‘घाशिराम कीतवाल” या नाटकाने तर इतिहास घडविला जर्मनीमध्ये झालेले पहिले.

मराठी नाटक म्हणूनही याकडे पाहिले जाते. श्रीराम लागू व अमोल पालेकरांचे गिधाडे हे सुध्दा वेगळया कारणास्तव वादग्रस्त ठरले. अशा अनेक नाटकांनी मराठीबरोबर इतरं भाषांमध्येही वादविवादांचे मोहोळ उठविले. तसेच मराठी रंगभूमीची किर्ती सातासमुद्रा पार नेली. विजय तेंडुलकरांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांच्यावर लेखनाचे संस्कार त्यांच्याच वडिलांमुळे लहानपणापासूनच होत गेले. त्यांची खऱ्या अर्थाने लेखनाची कारकीर्द १९५५ पासून सुरु झाली. लोकसत्ता, मराठी नवयुग, साप्तहिक वसुधा मासिक, महाराष्ट्रात ठाईम्स आदी वृत्तपत्र व मासिकात त्यांनी लिखाण केले.

ते नेहमी म्हणत की माणूस जन्मतःच मुक्‍त होतो. तसा मी मुक्‍त झालो आहे. ते परखड प्रामाणिक आणि मनस्वी व्यक्तिमत्व म्हणून जगले. तेंडुलकरांना माणूस नावाच्या प्राण्याबद्दल कुतुहल असल्याने त्यांनी आपल्या लेखणीद्वारे माणसाच्या अंतर्मनाच्या सतत वेध घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यांना उमगलेल्या माणसाचे वर्णन ते नाटकांतील व्यक्तिरेखांमध्ये करताना दिसतात. ही माणसे तुमच्या आमच्यातीलच असतात. पण त्यांना बघण्यासाठी एक विशिष्ट दृष्ठी लागते ती दृष्टी तेंडुलकरांनी आपल्या लेखनाद्वारे समाजाला दिली.

देशातील वाढता हिंसाचार या विषयावर अभ्यास करण्यासाठी तेंडुलकरांना नेहरु शिष्यवृत्ती मिळाली होती. १९७९ ते ८१ या काळात त्यांनी ठाठा इन्टिठ्यूट ऑफ सोशल सायन्स येथे व्हिजिंटिग प्रोफेसर म्हणूनही काम केले. १९८४ मध्ये केंद्र सरकारने त्यांना “कालिदास पुरस्कार” महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रार्थना, इमान, निशांत, मंथन, आक्रोश, गहराई, अर्धसत्य, कमला, मुसाफिर आणि आघात हे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. आक्रोश या चित्रपटाच्या पटकथा या संवादलेख आणि अर्धसत्य या चित्रपटासाठी पठकथा लेखनाबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

जीवनाबद्दल अखेरपर्यंत सकारात्मक पाहणारा आणि तरुणांच्या सान्निध्यात रमणार हा एक महान लेखक आपल्यातून निघून गेला तरी आपल्या पुस्तकातून मराठी वाचकांना नेहमी एक वेगळी दिशा देणारा दीपस्तंभ विजय तेंडुलकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

विद्याधर ठाणेकर

Avatar
About विद्याधर ठाणेकर 16 Articles
विद्याधर ठाणेकर हे ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष आहेत. ते मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे कार्यवाह आहेत. ते ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..