गजाजन दिगंबर माडगूळकर याना ‘ आधुनिक वाल्मिकी ‘ म्ह्णून मराठी साहित्य जगत ओळखत आहे. त्यांचा जन्म १ ऑक्टोम्बर १९१९ साली माडगूळला सांगली जिल्ह्यात झाला. त्यांनी कवि , गीतकार, लेखक, चित्रपट कथा अशा विबिध क्षेत्रात आपला ठसा उमटवला त्यांनी एकदोन चित्रपटात कामही केले होते. त्यांचे बालपण तसे खडतर गेले परंतु त्यांनी सर्वावर मात करून आपले स्थान मराठी साहित्यात अजरामर केले. त्यांच्या गीत रामायण ने तर संपूर्ण मराठी भाषेला अलंकारित केले. गदिमा आणि सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके या जोडीने गीत रामायण तर दिलेच परंतु असंख्य अजरामर गीते दिली .
१९३८ साली ते कोल्हापुरातील मराठी चित्रपटनगरीत आले आणि शेकडो गाणी दिली. गदिमांना १० भाषा येत होत्या. मराठीमधील लावणी या प्रकाराला त्यांनी एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी १५७ मराठी चित्रपट केले तर २३ हिंदी चित्रपट केले.
ते चित्रपटगीते सहजपणे लिहून देत असत अर्थात ते उत्तम कवि होते म्ह्णून त्यांना हे सहजपणे जमत होते. परंतु दुर्देवाने त्यांना कवि म्ह्णून काही लोकांनी नाकारले ह्याची त्यांना खंत होती . त्यांना कवी म्ह्णून ज्यांनी नाकारले ते इतिहासजमा झाले परंतु गदिमांनी जो इतिहास निर्माण केला त्याला मराठी भाषेत तोड नाही. ‘ आधुनिक वाल्मिकी ‘ ही पदवी त्यांना जनतेनेच बहाल केली.
त्यांचे १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत त्यात जोगिया , पुरिया , गीत रामायण ही काहीची नावे आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध आले आहेत ..त्यांनी जीवन ज्योती या चित्रपटाचे संवाद , चित्रपटलेखन केले त्याचप्रमाणे तुफान और दिया या चित्रपटाची कथा त्यांची आहे तर दो ऑखे बारह हात या चित्रपटांचे कथा , संवाद , लेखनही केले. अशा थोर आधुनिक वाल्मिकीचे १४ डिसेम्बर १९७७ साली वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply