अरे, अरे मला मारून तुला काय मिळणार आहे? माझ्याकडे तुला उपयोगी पडेल असे काहीही नाही.’ वाल्या कोळ्याला प्रथमच इतक्या धीटपणे बोलणारा माणूस भेटला होता. हे असे माणसांना मारणे कसे पाप आहे ते नारदाने वाल्याला समजावून सांगितले. त्यानंतर पश्चात्तापदग्ध वाल्या कोळी तपश्चर्येला बसला तो इतक्या निश्चयाने की त्याच्या सभोवती मुग्यांनी वारुळ केले, याला संस्कृतमध्ये वाल्मिक म्हणतात. जो असे वाल्मिक साचेपर्यंत तपश्चर्येला बसतो तो वाल्मिकी अशाप्रकारे वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. त्याने रामायण लिहिले. एखादा त्यात रमून अत्यानंद मिळवतो ते रामायण एक अध्यात्मिक स्वरूपाचे रुपकात्मक महाकाव्य. केवळ काव्य नसून आपल्या जीवनात अनुसरण्याचा आध्यात्मिक मार्ग आहे.
आपण रामायणातले काही प्रसंग पाहिले तर लक्षात येईल यात कसे अध्यात्म आहे ते ! फक्त काही नावे व प्रसंग पाहू, विस्तार मर्यादेमुळे अधिक सूक्ष्मपणे विचार करणे अशक्य आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
ही कथा इक्ष्वाकु वंशाची आहे. या शब्दाची इक्षू+वाक्, अशी फोड करता येईल. इक्षू म्हणजे गोड रस देणारा ऊस आणि अशी वाणी असणाऱ्यांचे कूळ ते इक्ष्वाकू. या कुळातील दशरथ राजा म्हणजे ‘दशेन्द्रिय रथो देही’ हे रूपक कठोपनिषदातही आलेले आहे. त्यानुसार या दशरथाला तीन राण्या होत्या. या साधक दशरथ राजाने पुत्रकामेष्ठी यज्ञ आयोजिला. अशा साधकाजवळ जर कौशल्य-कुशलबुद्धी नसेल तर त्याला काय साध्य होणार! म्हणून त्याची पत्नी कौसल्या तर दुसरी कैकेयी. जो साधक काया-देह काय आहे, याचा विचारही न करता साधना करतो त्याच्या सान्निध्यात कै+काया हे विचार असणारच. तीसरी पत्नी सुमित्रा. एकदा खडतर तपश्चर्या केल्यावर सर्व सुविचार मनात येतात. सर्वच चांगले मित्र होतात, म्हणून ही सुमित्रा.
दशरथ राजाची राम म्हणजे साधकाच्या ज्याचे लक्ष सतत लक्ष्मण. तो वनवासात झोपलाही नाही इतका झाला होता. यानंतर म्हणजे प्रकाश म्हणून आपल्यातील शत्रु तो शत्रुघ्न.
असा हा दशरथ आणावा म्हणून जंगलात कुमाराचा वध करून वास्तविक यज्ञात बकऱ्याला अजा जन्मत नाही तो, असे मुले पाहिली तर, पहिला चित्तात रमतो तो राम. ध्येयाकडे असते तो असताना चौदा वर्षे खडतर तपश्चर्येत गुंग प्रकाश पडतो. भा तो भरत. शेवटी प्रवृत्तीचे हनन करणारा राजा यज्ञासाठी पशू गेला आणि श्रवण-शापासहित परतला. बकऱ्याला बळी देतात म्हणतात. म्हणजे जो जर असेल तर समाज (सम+आज) वाढणार कसा? म्हणून या अज प्रकृतिला घालवावयास पाहिजे तरच समाज वाढेल. दशरथ राजा वनात गेला तो तपश्चर्या करण्यासाठीही. तेथे त्याने श्रावण किंवा श्रवणकुमाराला मारले. याचा अर्थ राजाने काहीही ऐकू नये. श्रवण बंद. आणि पुढे तो श्रवणकुमारच राजाला सांगतो “तू बोलू नकोस.” उपनिषदांमध्ये सांगितलेलेच आहे की ‘नायम् आत्मा प्रवचनेन लव्हवा ।’ न मेघया, न बहुता श्रुतेन । म्हणजेच श्रवणवृत्ती सोडल्याशिवाय आणि मौन धरल्याशिवाय साधनारूप यज्ञ सफल होणार नाही आणि आनंदरूप राम मिळणार नाही.
आध्यात्मिक अनुभव घेण्याकरिता तश्चर्येची जरुरी आहे म्हणून विश्वाचा मित्र-विश्वामित्र रामाला वनात घेऊन जातो. वैशिष्ट्यपूर्ण (वशिष्ठ ऋषीचा) उपदेश दशरथाने ऐकल्यावरच आणि मानवी जीवनातील आनंद, खरा आनंद, परमानंद रानावनात जाऊन तपश्चर्या केल्याशिवाय, राक्षसांना मारल्याशिवाय कसा मिळणे शक्य आहे? हे कळल्यावर दशरथाने त्यांना जाऊ दिले. तेही राक्षस रिपू, खरं दूषण यासारखे राक्षस मारण्यासाठी बरोबर ध्येयवादी लक्ष्मणही होता वनात त्यांनी त्राटिका वध केला. ही त्राटिका, मन्नियोगराजाची राणी.मग्नियोग म्हणजे (मन+नियोग) मनाला ताब्यात ठेवणे या अशा मनः प्रवृत्तिवर रामाने मात नाही केली. तर मनाला योग्य वळण लावून ते ताब्यात कसे ठेवणार? येथे आठवण येते ती मुक्ताबाईची. तिने, राग क्रोध आवरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।’ असे म्हटलेले आहे, त्याची.
सर्व परत यावयास निघतात. रामाचा पाय एका मोठ्या दगडाला लागतो. तो हळूहळू हालावयास लागून त्यातून एक स्त्री निघते ती अहल्या, ही इंद्राबरोबरच्या व्यभिचारामुळे तिचे पतिदेव गौतम ऋषी यांच्या शापाने शीला झाली होती. ती आता उ:शाप मिळून पुन्हा पूर्वपदावर आली. अहल्या म्हणजे जेथे हल चालवलेला नाही असे न नांगरलेले शेत, साधना सत्कर्म न केलेला देह. भगवतगीतेत सांगितल्याप्रमाणे क्षेत्र. अहल्याचा विवाह स्वयंवराने झालेला होता. जो सर्वात आधि पृथ्वीप्रदक्षणा करून येईल. त्याच्याशी विवाह. गौतम ऋषींनी स्वतःभोवतीच एक फेरी मारली, पिंडी ते ब्रह्मांडी, पृथ्वीप्रदक्षिणा झाली आणि गौतम म्हणजे ज्याचा इंद्रियनिग्रह उच्च दर्जाचा आहे तो, त्याच्याशी विवाहबद्ध अहल्या झाली,
हे सर्वजण मिथिलेला आले, ते सीता स्वयंवरासाठी शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवून सीता मिळविण्यासाठी, ही सीता कोण होती! पृथ्वी तत्वातून प्रकट झालेली पुन्हा पृथ्वीतत्वात विलीन होणारी म्हणजे ‘माती असशी मातीत मिळशी’ याची आठवण ताजी ठेवणारी. तिला वैदेही म्हणत असत. वैदेही म्हणजे जिला देह नाही अशी. जिला देह असून नसून सारखीच अशी, जिला देहाचे भान नसेती.
स्वयंवराचा पण होता शिवधनुष्य म्हणजे मेरुदंडावर प्रत्यंचा चढवणे. म्हणजेच कुंडलिनी जागृत करून ब्रह्मरंध्रात नेऊन स्थिर करणे. रामाने विश्वमित्राबरोबर जाऊन अरण्यात तपश्चर्या केल्यामुळे, त्याला हे शक्य झाले. रामाबरोबर सीतेची चुलतबहीण उर्मिला लक्ष्मणाला दिली. ज्याचे लक्ष साधनेशिवाय दुसरीकडे नाही त्याच्याजवळ विवेकाच्या उर्मिवृत्तीशिवाय दुसरे काय रहाणार! असे हे सर्व नंतर अयोध्येला येतात. जेथे युद्धाचे वातावरण नाही. अशांत वृत्ती नाही. शांतता नांदत आहे. अशा अयोध्येत येतात. दीर्घ कालानंतर पुरेशी साधना झाल्यानंतर राम व लक्ष्मण हे शांत चित्त होऊन येणार ते ठिकाण अयोध्याच असणार.
राम त्याच्या वंशातील रिवाजाप्रमाणे गोड बोलणारा होता, कोणालाही दुखवत नसे. त्याने व त्याच्या भावांनी त्यांच्या कुळाचे इश्वाकू हे नांव सार्थ केले. या गोड भाषण करणाऱ्या कुलाबरोबरच रामाच्या वंशाची आणखी दोन नावे आहेत. काकुस्थ आणि रघुकुल. काकू म्हणजे स्वरज्ञान आणि त्यात स्थिरावलेला तो काकुस्थ. या स्वरज्ञानाचा संबंध आपल्या शरीरात इडा, पिंगला, सुषुम्ना इत्यादी नाड्या आहेत, त्यांच्याशी जोडता येईल. थोडक्यात काकुस्थ म्हणजे स्वरोदयी सुद्धा त्याचप्रमाणे रघुकुल मधील ‘र’ म्हणजे अग्नी आणि अघ म्हणजे पाप. ज्यांची पापे जळून गेलेली आहेत अशांचे कूळ, ते रघुकुल.
आता कैकेयीच्या हट्टातून काय अर्थ निघतो ते पाहू. कैकेयीची हट्ट निर्मिती झाली ती मंथरेच्या सल्यानुसार. आपल्या चित्तातील भावना आणि वृत्तींचे मंथन करते ती मंथरा. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. राज्य सांभाळण्याआधि तापसी वृत्तीची गरज असते. स्वार्थ बाजूला सारून लोकोपरार्थ राज्यकारभार चालवायाचा असतो. सीता तर रामाची काया ती बरोबर पाहिजे तसेच लक्ष्मणही. या सर्वांना कायेबद्दल अनासक्त रहावयाला सांगते, कैकेयी राज्यवस्त्र त्यागून देहभाव सोडून वैराग्यशील वृत्ती ठेवावयास सांगते. कैकेयीला आपण विनाकारण नावे ठेवतो. ती नसती तर रामायण झालेच नसते. ही वैराग्यवृत्ती रामायणात सर्व ठिकाणी दिसते. रामाला गुह गंगापार, ज्ञानगंगेच्या पैलतीरावर घेऊन जातो. होडीतून आजूबाजूला लक्ष न देता राम, ज्ञानगंगा पार करतात. कोठे जातात! चित्रकूटाला. साधनेमध्ये न समजणारी अनेक रहस्ये चित्रासारखी पुढे उभी रहात असतात. चित्र कोडी न समजणारी कुटे ती चित्रकुटे. नंतर रामादी सर्व जातात दंडकारण्यात. दंड म्हणजे मेरुदंड (मुख्य मज्जारज्जू) आणि त्यातले आरण्य म्हणजे त्यातून पसरलेल्या असंख्य मज्जातंतूंचे जाळे. .
इकडे अयोध्येत दशरथ राजा मरण पावला आणि भरत आजोळी गेलेला परत आला. रामाची साधना, दशेंद्रियांतील भाव नष्ट झाल्याशिवाय योग्य रीतीने होऊ शकणार नाही म्हणून दशरथाचा अंत व्हावयास पाहिजे आणि केवळ आत्म्याच्या प्रकाशात रत होणाऱ्या भरताने वैराग्य प्रत राहून राज्य करणे योग्य दिसते.
रामाने विराक्षाला मारले व नंतर तो शरभंग ऋषींच्या आश्रमात गेला. राधा, म्हणजे मूर्तीमंत प्रेम, रामाने बाजूला सारले. विराक्षाला मारून त्याचप्रमाणे धनुष्यभंग केला तसा शरभंगही केला. नंतर ते सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात गेले. प्रेम बाजूला सारून शरभंग करून साधना झाल्यावर बुद्धी तीक्ष्ण होणारच यानंतर ते सर्व अगस्ती ऋषींच्या आश्रमात गेले. अगस्ती ऋषी विश्वर्भात रहात होते. जेथे दर्भही उगवत नाही तो प्रदेश विदर्भ आणि ज्याला गती नाही तो अगस्ती. त्याने तर संसार-सागराला पिऊन टाकले होते एवढा मोठा तो ऋषी होता.
नंतर ते सर्व पंचवटीत आले, तेथे दोन घटना घडल्या. शूर्पणखेची नाक, कान कापून रवानगी आणि सीताहरण शूर्पणखेतला ख म्हणजे आकाश आणि शूर्प म्हणजे साप. आपल्या साधनेची पोकळी नसलेली भरीवता मोजणे. पण, ते काही जमले नाही म्हणून शर्पणखेला परत पाठविले. नंतर घडले ते सीताहरण. सीता त्या मायावी हरणाच्या मोहात पडली. पण तीने ठरावीक मर्यादा ओलांडून नये असे लक्ष्मणाला वाटत होते. तरीही ती मोहात पडली आणि तिचे हरण झाले. तिला लंकेत नेताना, तीने जरी खरे दागिने अयोध्येला सोडले होते तरीही अशोक वनात म्हणजे जेथे शोक नाही अशा ठिकाणी जाताना स्वतःचे वृत्तीरूप सर्व अलंकार एका मागून एक फेकून दिले आणि चित्त निर्मल करून, मायेतील सर्व वृत्ती सोडून अशोक वनात राहिली.
वाल्मिकीने सीतेला शोधण्यासाठी वानरांची मदत घेतली आहे. वायुतत्त्वाची साधना करणारे जे नर ते वानर. म्हणूनच हनुमान हा वायुपुत्र होता, रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला किष्किंधाच्या राज्यावर बसवले. तारा त्याची राणी झाली. त्याला त्याने ठरविलेल्या कर्तव्याची जाणीव देण्यासाठी लक्ष्मणाला जावे लागले. सुग्रीवाने वानरांना सर्व दिशांना सीतेच्या शोधासाठी पाठविले. त्यातील हनुमंताला मात्र एका तपस्विनीने सीतेचा शोध घ्यावयाचा ते सांगितले. त्याप्रमाणेच अशोक वनात सीता सापडली तिला दिलासा देऊन हनुमंत मागे फिरले व दिसेल त्या राक्षसाला त्यांनी मारणे सुरू केले. शेवटी इंद्रजितशी गाठ पडली. त्याने ब्रह्मास्त्राने हनुमंताला पकडले. ब्रह्मास्त्राचा हनुमंतावर चांगलाच परिणाम झाला. त्याची अध्यात्मिक उंची वाढली व त्याने मायास्वरूप लंकेचे दहन केले. परत आल्यावर हनुमंताने रामाला सर्व कथन केले व लंकेवर स्वारी करून रावणाचा पाडाव करण्यास सुचविले.
लंकेत जाण्यासाठी एकच मार्ग, हा भवसागर तरूण जाणे, आणि ते शक्य आहे केवळ रामनाम घेण्याने. अशाप्रकारे सर्व वानरांसहित सर्वांनी रामनामाच्या सेतूने सागर पार केला. युद्ध सुरू झाले. बिभीषण नावाप्रमाणेच भीषणता विरहित सोज्वळ वृत्तीचा होता. तो रामाला येऊन मिळाला. मेघनाथ किंवा इंद्रजित एक अत्यंत अहंकारी असल्याने नावावरूनच समजते. त्याचा लक्ष्मणाने नायनाट केला. त्याचप्रमाणे तत्वज्ञान ऐकून ज्याचे कान कुंभासारखे मोठे झाले आहेत असा कुंभकर्ण आणि दशग्रंथ पाठ असणारा दशमुखी रावण यांना इतक्या ज्ञानाने जरासुद्धा विनम्रपणा न आल्यामुळे त्यांच्याशी अहंकाराला मूठमाती देऊन रामाने त्यांचा उद्धार केला.
राम अशांत वैररहित अयोध्येत परत आला. पण वस्त्रवृत्ती धुवून शुद्ध करणाऱ्या एका परटाच्या बोलण्यावरून सीता गर्भवती असतानाही तिचा त्या कायावृत्तीचा त्याग राम करतो. सीता वाल्मिकीच्या आश्रमात जाते. तिथे तिला लव पुत्र झाला. लव म्हणजे क्षण. क्षणभर सीता नदीवर गेली. वाल्मिकीना लव कोण दिसेना म्हणून त्यांनी दर्भ-कुशापासून दुसरा लवासारखा दिसणारा मुलगा तयार केला, तो कुश. सीतेने दोघांना पाहिले व शेवटी दोघांचाही सांभाळ केला. या दोघांनी राम दरबारात जाऊन रामायण गायले. लव कुश यांच्या त्या मधुर कोमल आवाजाबरोबर त्यांच्यात कणखरपणाही होता. त्यांनी रामाच्या अश्वमेघाचा शुभ्र अश्व धरला आणि रामाबरोबर युद्धही केले.
भूमीतून निर्माण झालेली सीता परत भूमीत गेली. तिने भूमीला स्वतःला अर्पण केले. आणि राम! त्याची काया नाहीशी झाल्यामुळे तो संपला होता. सरला होता. त्याने शरयु नदीत जलसमाधी घेतली. गीता मृश्रते.
यद्गत्वा न निवर्तते, तद्धाम परमं मम।
आधार:-योगी वाल्मिक लिखित ‘रामायण रहस्य’
-ॲॅड. सी. एच. भीसे
(‘संतकृपा’ या नियतकालिकात प्रकाशित झालेला लेख)
Leave a Reply