मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष आहे. तो जंगली वृक्ष आहे. भारतातील उष्ण प्रदेशातल्या पानगळीच्या जंगलात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सह्याद्री, सातपुडा व विंध्य पर्वतातल्या जंगलात मोहाची झाडे आढळतात. कमी पावसाच्या कोरड्या व उष्ण हवामानात मोह वुक्ष वाढतो. समशीतोष्ण हवामानातही तो वाढतो. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, ओरिसा या राज्यांतील अरण्यात मोहाची झाडे आहेत. हिमालयातील टेकड्यांच्या पायथ्यालाही मोह वृक्ष दिसतात. रावी पासून गंडकी नदीच्या खोऱ्या पर्यंत मोहाची झाडे आढळतात. कमीत कमी १ ते ८ डिग्री सेंटिग्रेड व जास्तीत जास्त ४१ ते ४८ सेंटिग्रेडपर्यंतचे तापमान मोहाचे झाड सहन करू शकते. ७५० मिलिमीटर ते १८७५ मिलिमीटर पावसात मोहाची झाडे चांगल्या रीतीने वाढतात. मध्य व उत्तर प्रदेशात आंब्यांच्या झाडांच्या खालोखाल मोहाची झाडे वाढलेली दिसतात. दक्षिण भारतात ही मोहाची झाडे आहेत. मात्र भारतातील वाळवंटी प्रदेशात मोह आढळत नाही. कारण वाळवंटी भागातील उष्णता त्याला सहन होत नाही. बिया वाटल्यावर तुपासारखे तेल निघते म्हणून मोहाला इंग्रजीत ‘बटर ट्री’ म्हणतात.
मोह: (माहवा हि. माहुआ, मोहवा, मौवा गु. महुडा क. हिप्पे सं. मधूक इं. साउथ इंडियन महुआ मोवा बटर ट्री, इंडियन बटर ट्री, मोवा ट्री लॅ मधुका लँगिफोलिया, बॅसिया लाँगिफोलिया कुल-सॅपोटेसी). फुलझाडांपैकी (वनस्पति, आवृत्तीबीज उपविभाग) द्विदलिकित (बियांत दोन दले- दलिका-असलेल्या वनस्पतींच्या) वर्गातील एका मोठ्या वृक्षाचे नाव. म. इंडीका, म. लॅटिफोलिया अथवा बॅ. लॅटिफोलिया नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका वृक्षाला काही देशी नावे वर दिलेल्या नावांपैकीच असून दोन्ही वृक्ष एकाच प्रजातीतील दोन जाती आहेत कित्येक शारीरिक लक्षणे व गुणधर्म दोन्हींत समान आहेत त्यामुळे व्हान रोएक या शास्त्रज्ञांच्या मते हे दोन्ही वृक्ष भिन्न जाती नसून म. लाँगिफोलिया या एकाच जातीतील दोन प्रकार आहेत, असे समजणे योग्य ठरते. लाँगिफोलिया हा एक प्रकार व लॅटिफोलिया हा दुसरा प्रकार समजावा. पुढे दिलेल्या वर्णनात म. इंडिका व म. लाँगिफोलिया अशा दोन जाती मानून स्वतंत्र वर्णने दिली आहेत.
मोह हा डेरेदार वृक्ष आहे. तो ४० ते ६० फूट उंच वाढतो. मोहाचे झाड ६० ते ७० वर्षांपर्यंत जगते.
महुआ लॉगींफोलीया : हा मोठा भव्य, सु. २०–२५ मी. उंच, पसरट माथ्याच्या वृक्ष, दक्षिण भारतातील असून त्याच्या खोडावरती साल करडी अथवा गर्द तपकिरी व खवलेदार असते. पाने चिवट, सोपपर्ण, साधी, काहीशी लांबट व भाल्यासारखी ७•५–१२.५ सेंमी. X २•५–४•५ सेंमी. तळाकडे निमुळती व विशेषतः फांद्यांच्या टोकांकडे त्यांचे झुबके दिसतात. फुलेही फांद्याच्या टोकांस तशीच वाढलेली आढळतात ती अनेक, लहान व फिकट पिवळी सु.१•५. लांब व सुगंधी असतात संवर्त (पाकळ्यांच्या खालच्या भाग) तांबूस, लवदार व ४ संदलांचा असून पुष्पमुकुट घंटाकृती-नलिकाकार, मांसल व लवकर पडून जाणारा असतो. पाकळ्या ६–१२ केसरदले १६–२० (फूल). मृदुफळ सु. ५ सेंमी. लांब, लंबगोल, पिवळे व कोवळेपणी लवदार असते. बिया पिवळ्या, चकचकीत, एक ते दोन, काहीशा चपट्या आणि अपुष्प (गर्भाभोवती अन्नांश नसलेल्या) असतात.
म. इंडिका : सॅपोटेसी अथवा मधूक कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. त्याची वाढ सर्व प्रकारच्या जमिनीत होते व तो काहीशा रुक्ष हवेतही वाढतो. अधिक पाऊस व ओली जमीनही त्याला चालते मात्र भरपूर प्रकाश आवश्यक असतो. हरिणे, गुरे व बांडगुळे यांचा त्याला उपद्रव होतो. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात त्याची छाटणी न करता ठेवलेल्या खुंटावर पुढे नवीन वाढ चांगली होते.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेशातील साल-वने इ. ठिकाणी तो सामान्यपणे आढळतो. उत्तर भारत व द. द्विपकल्प येथील सपाट भागी तो लावलेला दिसतो. जंगल तोडून लागवडीकरिता मोकळ्या केलेल्या वनात तो राखलेला असतो. खोडाची साल गर्द रंगाची व चिरा पडलेली असून पाने साधारणपणे म. लाँगिफोलियाप्रमाणे (७•५–२३ सेंमी. X ३•८–११•५ सेंमी.). चिवट, कोवळेपणी लवदार असतात. फुले अनेक, लहान व पाने दाट झुबक्यांनी फांद्यांच्या शेवटी येतात फुलांचा रंग व आकार वर वर्णन केल्याप्रमाणे असतो. संदले ४, क्वचित ५ पाकळ्या ७–१४ आणि त्यामध्ये २०–३० केसरदलांची तीन मंडले असतात. मृदुफळ सु. ५ सेंमी. लांब, लंबगोल, प्रथम हिरवट नंतर पिवळट लाल किंवा नारिंगी बनते. बिया १–४, पिंगट, लंबगोल, अपुष्प, चकचकीत, २•५–३•७५ सेंमी लांब असतात. इतर सर्व सामान्य लक्षणे सॅपोटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे आणि इतर गुणधर्म व उपयोग वर वर्णन केलेल्या जातीतल्याप्रमाणे असतात. पालघर जिल्ह्यात आदिवासींचा कल्पवृक्ष असलेल्या मोहाच्या फुला-फळांपासून भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळत असल्याने हे झाड आदिवासींसाठी वरदान ठरते आहे. उन्हाळ्यात ह्या वृक्षांना बहर येतो. मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष. सह्याद्री, सातपुडा व विंध्य पर्वतातील जंगलात मोहाची झाडे आढळतात. त्याची फुले, फळे, पाने, साल, लाकूड, मुळे, फांद्या या सर्व अवयवांचा उपयोग होत असल्याने हे झाड आदिवासींसाठी कल्पवृक्ष ठरते आहे. गाभ्यातील लाकूड लालसर तपकिरी असते. मोहाचे लाकूड खूप कठीण व सरळ असते. फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान मोहाची पाने झडतात. त्याच्या खोडाचा घेर मध्यम असतो. साल धुरकट-राखत रंगाची असते. तिच्यावर उभे पापुद्रे असतात किंवा आडव्या खाचा असतात. साल १.२ सेंटीमीटर जड असते. त्याच्या गाभ्यातले लाकूड लालसर तपकिरी असते. मोहाचे लाकूड खूप कठीण व सरळ असते. जाड व टिकाऊ असते. त्याच्यावर हवेचा परिणाम होत नाही. मात्र त्याला कीड लागते. काष्ठकण खूप जवळ जवळ असल्याने करवतीने कापणे खूप अवघड जाते. प्रत्येक क्युबिक फुटास लाकडाचे वजन २५० किलो भरते. मोहाचे पाने लांबोळी असतात. गुळगुळीत असतात. फांदीच्या शेंड्यांवर पानांचा झुपका उगवतो. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मोहाची पाने झडतात. त्या वेळी मोह फुलू लागतो. फुलांचा रंग फिका बदामी असतो. त्यांचा बाह्य कोश मनुक्याच्या रंगासारखा दिसतो फुले अर्धा इंच आकाराची असतात. फुले रात्री फुलतात. सकाळी झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो. फुलांचा बहार ओसरल्यावर मोहाच्या झाडास फळे येऊ लागतात. त्याच बरोबर लाल पालवीने मोह बहरतो. फळांच आकार बोरासारखा वाटोळा असतो. फळांचा रंग हिरवा असतो. फळे रसाळ असतात. जून-जुलैत फळे पिकतात व खाली गळून पडतात. दक्षिण भारतात ऑगस्ट-सप्टेंबरात फळे गळून खाली पडतात.
आदिवासींचा कल्पवृक्ष : कोकणात जसा नारळ कल्पवृक्ष समजला जातो, तसा मोह आदिवासींचा कल्पवृक्ष आहे. मोहाच्या फुला-फळांपासून त्यांना रोजगार मिळतो. भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळतात. तसेच फुला फळांचा अन्न म्हणूनही ते उपयोग करतात. बैलघाणीत बियांचे तेल काढतात. त्यांचा स्वयंपाकात उपयोग करतात. त्याच तेलाचे दिवेही ते पूर्वी जाळायचे. तेल काढल्यावर बियांची पेंढ बनवितात, तिचा खतासाठी उपयोग होतो.
आदिवासींची उपजीविका : मोहाची फुले रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहेत. उन्हाळ्यात त्यांची उपजीविका मोहाच्या फुलांवर होते. मोहांच्या फुलांत साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी मद्य बनवितात. या मद्यात ब जीवनसत्त्व असते. विवाह व इतर सणांच्या दिवशी मोहाचे मद्य प्राशन करणे आदिवासी पवित्र समजतात. कोणताही आजार झाला की ठाकर, कातकरी, कोरकू, गोंड, माडिया या आदिवासी जमाती मोहाच्या दारूचा औषध म्हणून उपयोग करतात.
फुलात साखरेबरोबरच कॅल्शियम व इतर जीवनसत्वे असतात. कार्बोहैड्रेटस्, प्रोटीन्स, व्हिटॅमिन व अनेक पोषक द्रव्ये फुलात असतात. आदिवासी लोक तांदळात मोहाची फुले शिजवून खातात. इतर कोणत्याही टॉनिक पेक्षा अशा प्रकारचे अन्न हे उत्तम टॉनिक आहे. त्याचा आदिवासींच्या शरीरपोषणास उत्तम उपयोग होतो.
फळांचा उपयोग : जून-जुलैत मोहाची फळे पिकतात. फळे गोल असतात. फळात भरपूर रस असतो. फळे पिकल्यावर खाली पडतात. आदिवासी व खेड्यापाड्यातील लोक फळे गोळा करतात. फळे तशीच वा शिजवून त्याची भाजी करून खातात. फळातही भरपूर प्रमाणात साखर असते. अल्कोहोल प्रमाणही चांगले असते. एक टन फळांपासून ११० लिटर शुध्द अल्कोहोल मिळते. याशिवाय फळात तेल, इथिल, टर्पेंटाईन ओईल असते. सर्वात जास्त प्रमाणात ६७.९% अल्कोहोल असते.
बियांतील तेल: मोहाच्या बियांत २० ते २५% तेल असते. तसेच इतर रसायने असतात. क्रूड, प्रोटीन, फायबर, फॉस्फरस, राख, पोटाश व इतर प्रोटीन्स मोहाच्या बियांत असतात. लाकडाच्या घाणीत या बियांचे तेल काढतात. आदिवासी भाज्यांत व दिव्यासाठी पूर्वी या तेलाचा वापर करायचे. या तेलाचा चार्म रोग व डोकेदुखीवरील विविध प्रकारच्या औषधांत उपयोग करण्यात येतो. तसेच मेणबत्ती व कन्फेक्शनरी बनवण्यासाठी मोहच्या बियांच्या तेलाचा वापर केला जातो. धुण्याचा साबण बनवण्यासाठी मोहाच्या बियांच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मोहाचे तेल तुपासारखे दिसत असल्याने शुद्ध तुपात भेसळ करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. धुण्याचा साबण बनवण्यासाठी मोहाच्या बियांच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. साबण बनवणाऱ्या कारखान्यांकडून या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अल्कोहोल व स्टॅटिक अॅसिड बनवण्यासाठी मोहाच्या बियांचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. कार्बन व डिंक बनवण्यासाठीही मोहाच्या बिया वापरतात.
बियांतून तेल काढल्यावर त्यांच्या चोथ्याची पेंड बनवितात. या पेंडीचा उपयोग खत म्हणून शेतात केला जातो. पेंडीत पिकांना लागणारी पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. सल्फेट व नायट्रोजन खतात पेंड मिसळून पिकांना घालतात, त्यामुळे पिकांची वाढ जोमदारपणे होते. मोहाच्या बियांची पेंड उत्तम सेंद्रिय खत आहे. एका मोहाच्या झाडापासून आकारमानानुसार ५ ते २५ किलो वाळलेल्या बिया मिळतात.
मोहाच्या पेंडीचा धूर केल्यास साप व उपद्रवी किडे-कीटक पळतात, घराजवळ येत नाहीत असा आदिवासींचा विश्वास आहे. सर्पदंशावरही ते पेंडीचा उपयोग करतात. पाण्यातल्या माशांना भुलवण्यासाठी आदिवासी पाण्यात पेंडीचा भुसा टाकतात.
मोहाच्या सालीत टॅनिन असते. सालींचा उपयोग रंगासाठी करतात. मोहाची पाने पाळीव प्राण्यांसाठी उत्तम खाद्य आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या भागांतील शेतकरी गायी गुरांना मोहाच्या पानांचा सकस आहार देतात. त्यामुळे दुभती जनावरे भरपूर दुध देतात. असा त्यांचा अनुभव आहे. ज्या भागात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासते त्या भागात मोहाची पाने चाऱ्याची गरज भागवण्यास उपयोगी पडतात.
पानांचे द्रोण व पत्रावळी आदिवासी तयार करतात. लग्न व सणांच्या दिवशी या पत्रावळी व द्रोणांना चांगली मागणी असते. ३५ ते १०० रुपये शेकडा भाव मिळतो.
मोहाचे लाकूड: मोहाचे लाकूड सागापेक्षाही कठीण असते. परंतु किडीमुळे त्याचा टिकाव लागत नाही, हा मोठा दोष मोहाच्या लाकडात आहे. मोहाच्या झाडात १७% टॅनिन असते. त्याचा रंगासाठी उपयोग होतो. ०.१६ एम्.एम्. आकाराचा फायबरचा धागाही लाकडापासून मिळतो. पेपर बनवण्यासाठी लागणारा लगदाही या लाकडाचा बनवितात. फर्निचर, नावा, बैलगाड्यांची चाके, छोटे छोटे लाकडी पूल, चहाची खोकी, घरांचे खांब व तुळ्यांसाठी मोहाच्या लाकडाचा उपयोग होतो. परंतु या कारणासाठी मोहाचे झाड सहसा तोडले जात नाही. कारण वर्षानुवर्षे पाने, फुले, फळे व बिया यांचे उत्पन्न मोह देतो. लाकडापेक्षा त्याचे हे इतर उत्पन्न अधिक महत्वाचे आहे.
मोहाचे औषधी उपयोग : अनेक आयुर्वेदीय औषधांत मोहाचा उपयोग केला जातो. मोहाच्या लाकडातील टॅनीनचा जखमेवरील उपचारासाठी उपयोग केला जातो. मोहाच्या खोडातून व फुलांतून पांढरा चीक निघतो. या चिकाचा उपयोग संधिवातावर उपचार करताना होतो. बियांपासून निघणारे तेल सांधेदुखी, डोकेदुखी व इतर दुखण्यांवर वापरतात. गोवर, कांजण्या, फोड यांवरही आदिवासी तेलाचा उपयोग करतात. मोहाच्या बियांचे तेलही काढले जाते. आदिवासी भाज्यांसाठी व दिव्यासाठी पूर्वी या तेलाचा वापर करायचे. या तेलाचा त्वचारोग व डोकेदुखीवरील विविध प्रकारच्या औषधांत उपयोग करण्यात येतो. महुआचे तेल मालिश करण्यासाठी देशील वापरतात.
महुआचा उपयोग केवळ त्वचा मऊ करण्यासाठीच होत नाही, तर त्वचा रोग इसबचा उपचार म्हणून देखील होतो. यासाठी महूआच्या पानांना तिळाचे तेल लावून गरम करावे. आपल्या त्वचेच्या खाज सुटणे आणि पुरळ उठणे असा विकार असलेल्या भागावर ही गरम पाने लावा. या पानांचा परिणाम म्हणजे इसबचा बाधित भाग कमी होण्यास फायदा होईल. याशिवाय महुआ फुलांच्या सेवनाने महिलांमध्ये दुग्ध उत्पादनाची क्षमता वाढते.
मोहाची साल पाण्यात शिजवली जाते आणि एखाद्या मनुष्याच्या अंगात जर थंडी भरली असेल तर किंवा त्याचे अंग दुखत असेल तर अशा पाण्याने त्या मनुष्याची आंघोळ केली जाते, याचा त्वरित फायदा होत असतो. मोह म्हटले की दारू असा जो काही गैरसमज पसरला आहे. त्याला छेद देत आता औषधीयुक्त मोह मेळघाटातील रहिवाशांसाठी समृद्धीचे साधन बनले आहे. यामुळेच आता मेळघाटातील मोहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलायला लागला आहे. आदिवासी मोहाच्या झाडाला पवित्र मानतात. आपला अन्नदाता मानतात. म्हणून ते मोहाचे झाड तोडत नाहीत. जन्म, मृत्यू, विवाह, सणांच्या दिवशी मोहाच्या झाडाची पूजा करतात. लग्नाच्या दिवशी गाणी म्हणत मोहाच्या झाडाची फांदी तोडून आणतात. फांदी मांडवात रोवतात. नवरा-नवरी या फांदीची पूजा करतात. आपल्या सुखी संसारासाठी मोहाच्या झाडाची प्रार्थंना करतात.
या वनस्पतीचा वापर दारू काढण्यासाठी देखील केला जातो. ग्रामीण भागामध्ये गावठी दारू मिळते ती दारू या वनस्पतीच्या फुलापासून तयार केलेली असते आणि त्यालाच ग्रामीण भागातील लोक गावठी दारु असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला अत्यंत महत्त्व आहे. या वनस्पतीच्या फुलाची चव गोड असते. त्यामध्ये सी जीवनसत्व अत्यंत मोठ्या प्रमाणात असून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे आणि या फुलांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असून प्रथिने व मेद ही मोठ्या प्रमाणात आहे. अनेक संशोधनांमध्ये मोहाच्या फुलांमध्ये जिवाणू रोधक म्हणजेच वेदनाशामक आणि विरोध करण्याची प्रतिकारशक्ती वाढण्याची क्षमता असते.
सोन्याहुन मौल्यवान मोहाची फुले:
सामान्यपणे यांचा वापर चष्मा घालवण्यासाठी, पित्त कमी करण्यासाठी, पित्तासाठी पिता मध्ये डोकं दुखतं ते कमी करण्यासाठी, स्त्रियांना मूल होण्यासाठी किंवा त्यांचा वंध्यत्व जाण्यासाठी, आणि अत्यंत महत्त्वाचा उपयोग म्हणजे मूळव्याध कमी करण्यासाठी, आणि स्त्रियांना दूध येण्यासाठी उपयोग केला जातो. या सर्वांसाठी या वनस्पतीचे फूल अत्यंत गुणकारी आहे. या फुलाचा वापर यासाठी कसा करावा याची माहिती जाणून घेणार आहोत आणि या वनस्पतीचे फूल आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
याची फुले खाणे योग्य असून त्यात मोठ्या प्रमाणात साखर, जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे, मेद आढळतात. त्या फुलांचा वापर नैसर्गिक गोडी आणणारे पदार्थ मध्ये देखील केला जातो. आदिवासी लोक भाजी बनवून खातात. जनावरांच्या वापरासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहेत आणि त्याच बरोबर मित्रांनो ज्या व्यक्तींना प्रोटीनची शरीरात कमतरता आहे त्या व्यक्तींना रोज सकाळी दोन ते तीन फुल जर दिली तर, शरीरातील प्रोटीन वाढण्यासाठी मदत होते. आयुर्वेदात या फुलांना अत्यंत महत्त्व असून शरीर थंड करण्यासाठी वातशामक आणि दुग्ध वर्धक त्याचप्रमाणे स्तंभ म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतात.
दुसरी गोष्ट म्हणजे चष्मा कमी करण्यासाठी ही फुल तुम्ही साधारणत: सकाळी सकाळी एक चमचा बडीशेप सोबत एकत्र खाल्ली तर तुमचा चष्मा कमी होण्यासाठी मदत होते आणि तिसरी गोष्ट अशी की, ज्या स्त्रियांना मूल होत नाही, दूध कमी आहे किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनात इतर प्रॉब्लेम आहेत. त्याचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी या फुलांचा वापर करता येतो. सकाळी एक चमचा बडिशोप आणि एकत्र पाच ते सहा फुले एकत्र खाल्ली खाल्ली व त्यावर ती एक ग्लास कोमट पाणी पिले स्त्रियांना मूल होण्यासाठी मदत होते. कारण त्यामुळे एस्ट्रोजन चे प्रमाण आहे. त्याचबरोबर या फुलांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी देखील या वनस्पतीचा वापर केला जातो.
या फुलांमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जर तुम्ही दोन ते पाच फुले रोज सकाळी खात असाल तर तुमची प्रतिकारशक्ती एका महिन्यात दुपटीपेक्षा जास्त वाढते. तिसरा आणि महत्त्वाचा घटक या फळांमुळे मूळव्याध कमी होण्यासाठी मदत होते. त्याच्यासाठी सकाळी मुळव्याधाचा उपाय करण्यासाठी ही फुले तुपामध्ये खायची आहेत. त्यावर एक तास काहीही खायचं नाही. तुमचा मुळव्याध आठ दिवसात कमी होतो.
ज्या महिलांना दूध नाही अशा महिलांनी या वनस्पतीची चार ते पाच फुले दुधामध्ये मिक्स करून खाल्ली असता दूध भरपूर प्रमाणात येते. अशा प्रकारे या वनस्पतीचा वापर करण्यासाठी केला जातो. खास करून या वनस्पतीचा वापर ग्रामीण भागामध्ये दारू काढण्यासाठी केला जातो. त्यामुळे या वनस्पतीचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु नये. कारण नशा जडण्याची शक्यता असते.
वरील माहिती स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
इतर उपयोग
मेणबत्ती बनविण्यासाठी मोहाच्या बियांच्या तेलाचा वापर केला जातो. धुण्याचा साबण तयार करण्यासाठीही याचा वापर केला जातो. बियांतून तेल काढल्यावर त्यांच्या चोथ्याची पेंड बनवितात. या पेंडीचा उपयोग खत म्हणून शेतात केला जातो. पेंडीत पिकांना लागणारी पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. सल्फेट व नायट्रोजन खतात पेंड मिसळून पिकांना घालतात, त्यामुळे पिकांची वाढ जोमदारपणे होते. मोहाच्या बियांची पेंड उत्तम सेंद्रिय खत असते. पेंडीचा धूर केल्यास साप व उपद्रवी किडे-कीटक पळतात, सर्पदंशावरही ते पेंडीचा उपयोग करतात. पाण्यातील माशांना भुलविण्यासाठी आदिवासी पाण्यात पेंडीचा भुसा टाकतात. मोहाच्या सालीत टॅनिन असते. या सालींचा उपयोग रंगासाठी करतात.
मोहाची पाने पाळीव प्राण्यांसाठी उत्तम खाद्य आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या भागांतील शेतकरी गायी-गुरांना मोहाच्या पानांचा सकस आहार देतात. त्यामुळे दुभती जनावरे भरपूर दूध देतात. पानांचे द्रोण व पत्रावळी आदिवासी तयार करतात. लग्न व सणांच्या दिवशी या पत्रावळी व द्रोणांना चांगली मागणी असते. ३५-१०० रुपये शेकडा भाव मिळतो. मोहाचे लाकूड सागापेक्षाही कठीण असते. धागा व पेपर बनविण्यासाठी लागणारा लगदाही या लाकडाचा बनवितात. फर्निचर, नावा, बैलगाड्यांची चाके, छोटे छोटे लाकडी पूल, चहाची खोकी, घरांचे खांब व तुळ्यांसाठी मोहाच्या लाकडाचा उपयोग होतो. परंतु या कारणासाठी मोहाचे झाड सहसा तोडले जात नाही. कारण वर्षानुवर्षे पाने, फुले, फळे व बिया यांचे उत्पन्न मोह देतो. लाकडापेक्षा त्याचे हे इतर उत्पन्न अधिक महत्त्वाचे आहे.
मोहाच्या तेलाचा शरीराची मालिश करण्यासाठी, साबण, डिटर्जंट बनवण्यासाठी वनस्पती तुपाच्या रुपात वापर होतो. सामान्य तापमानात हे तेल घट्ट होते. मोहापासून फक्त दारूच मिळते असं नाही, तर त्यापासून केलेली लहान लहान बिस्किट्स तयार केली जातात. मोहाचे लाडू गुजरातच्या स्त्रिया विकत घेऊन जातात. डाळीच्या पुरणपोळी पेक्षा मोहाची पुरणपोळी अतिशय स्वादिष्ट असते. जाळण्यासाठी मोहाच्या झाडाचा सगळ्यात जास्त होतो, हे लाकूड लवकरच फुटते आणि लवकरच जळते म्हणून इंधन म्हणून मोहाचा सगळ्यात जास्त वापर होतो.
मोह फुलांची भाजी सुद्धा केली जाते, टोळीच्या तेलात फ्राय करून तिखट मीठ टाकून, मोहफुलांची भाजी केली जाते. वाळलेल्या मोहात चण्याची किंवा लाखोरीची डाळ टाकून मोहांचे वरण सुद्धा केला जाते. आजकाल गावागावांत भाज्या उपलब्ध झालेल्या आहेत, पावसाळ्यातील दिवसात अशा भाज्या मिळत नाहीत तेव्हा मोहाचे वरण सुद्धा केले जाते. जवस आणि मोह भाजून व कुटून सुपारी सारखे खेड्यामध्ये खातात. मोहफुले पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी काढून ते शिजवले जाते, ते अगदी शहदासारखे बनते त्याला पोळी सोबत खाल्ले जाते. कधी कधी यात मुरले टाकून त्याचे लाडू तयार केले जातात, मोहाची वाळलेली फुले भाजून त्यात गूळ टाकून त्याचे लाडू बनवले जातात तर कधी पीठ टाकून त्याचे वडे म्हणजेच मूठ्ठे बनवतात, भंडाऱ्याकडे यांना मोहाचे बुढें असे म्हणतात, याला मोहाचे बोंड असेही म्हटले जाते. बुड्ढे गरम असतात, त्यांनी पोट भरते यामुळे खोकला होत नाही.
आदिवासी जनतेला निसर्गाकडून मिळालेले वरदान म्हणजे मोहाचे झाड आहे. मोहाच्या बहुगुणी उपयोगाने आदिवासी समाजाला आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी उत्पन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत मानले जाते. आदिवासी लोकांच्या अनेक विधी- परंपरामध्ये मोहाच्या झाडाला विशेष महत्व आहे. आदिवासी जन्म, मृत्यू, लग्नविधी, सण- उत्सवाच्यावेळी मोहाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात, अशी माहिती आदिवासी अभ्यासक दिनेश नंदकर यांनी दिली. कपडे धुण्याचे साबण, मेणबत्ती तसेच सॅनिटायझर अशा विविध वस्तू तयार करण्यात येत आहेत. मेळघाटात सध्या बचत गटाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मोहापासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. अनेक व्याधींसाठी उपयुक्त असणारे मोहाचे लाडू मेळघाटातील आदिवासी महिलांच्या बचत गटाच्या वतीने मोठ्या प्रमाणात तयार केले जात आहे. अमरावती शहरासह विदर्भात विविध भागात आयोजित केल्या जाणाऱ्या शासकीय कृषी मेळाव्यामध्ये मेळघाटातील मोहाचे लाडू अनेकांना आकर्षित करायला लागले आहेत. माणसांप्रमाणेच जनावरांना देखील औषध म्हणून मोहाचे लाडू खायला दिले जातात. ग्रामिण भागात रोजगार, फळे (टोळ – मोह संपल्यानंतर फुलांचे ऐवजी फळ लागते, तो म्हणजे टोळ होय. टोळीचे तेल काढले जाते,) या पासुन तेल मिळते, वंगण म्हणुन ते उपयुक्त ठरते.
तसेच मोह फुलांमध्ये 1.40 टक्के प्रोटीन आहे. तसेच 70 टक्के खनिज, 22.70 टक्के कार्बोहायड्रे, 111 टक्के कॅलरीज, 45 टक्के, कॅल्शियम, 23 टक्के लोहतत्व आणि 40टक्के विटामिन सी असल्याचे संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. मोहाच्या बियांमध्ये सुमारे 45 ते 50 टक्के खाद्य तेल आणि 16 टक्के प्रथिने आहेत. त्वचारोगावरील औषधे, साबणनिर्मिती, इंजीन ऑइल म्हणून तेलाचा उपयोग होतो. विशेष म्हणजे मोहांच्याफुलांत साखरेचे आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. एक टन फुलांपासून सुमारे 340 लीटर शुद्ध अल्कोहोल मिळते. इंजिनाचे इंधन म्हणून या अल्कोहोलचा उपयोग होतो. विविध उपयोगांसाठी मोहाच्या फुलांना मागणी आहे. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ तयार होत असलेल्या मोहाच्या फुलांमुळे कुठलाही अपाय होत नाही. मात्र त्यापासून मद्य तयार केले जाते या एकमेव गैरसमजुतीतून महाराष्ट्रात मोहफुलांची खुली विक्री करण्याची परवानगी नव्हती. इंजिनचे इंधन म्हणून या अल्कोहोलचा उपयोग होतो. व्हिनेगर बनवण्यासाठी फुलांचा उपयोग होतो. अहमदाबादच्या फूड क्राफ्ट संस्थेने मोहाच्या फुलांपासून जॅम आणि जेली बनवण्याचा गृहउद्योग सुरु केला आहे. विविध उपयोगांसाठी मोहाच्या फुलांना मागणी वाढत आहे.
मोहफुलावर संशोधनाची आवश्यकता: मोह हा पूरक उद्योगासाठी बहुउपयोगी वृक्ष आहे. या वृक्षाचे फायदे पाहता यावर अधिक संशोधनहोणे गरजेचे आहे, असे प्रा. सावे यांचे मत आहे मोहफुलाचे महत्त्व विशद करताना प्रा. सावे म्हणतात, “एका मोहाच्या झाडांपासून लाकूड, साल, बिया, पाने, तेल, पेंड, फळ यासून विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या बहुउपयोगी झाडावर उत्तर प्रदेशमधील फैजाबाद येथील नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ येथे संशोधन झाले आहे. या विद्यापीठाने त्या भागात चांगल्या येणार्या मोहाच्या जातींची निवड केलेली आहे.” जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठाने मोहाच्या जाती विकसित केल्या आहेत.
स्थानिक आदिवासी गावकर्यांना लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाते. मोहफुलांची संख्या आणि गावकर्यांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येकाला मोहाचे झाड दिले आहे. यामुळे स्थानिकांकडून मोहाचे जतन व संरक्षण होते. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 आणि मुंबई मोहफुले नियम 1960च्या नियमामध्ये दिनांक 10/04/2018 आणि 3/5/2021च्या अधिसूचनांनुसार महाराष्ट्र शासनाने सुधारणा करून मोहाफुलावरील निर्बंध शिथिल केले होते. आता शासनाच्या गृह विभागाने 4/5/2021च्या निर्णयानुसार त्यात आणखी बदल करून मोहफुलास राजाश्रय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
मोहापासून दारू तयार करणे महाराष्ट्रात सरकारमान्य झाले आहे. यामुळे आदिवासींना उत्पन्नाचे साधन मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्याची संधी मिळाली आहे.
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
इ मेल : dkkul@yahoo.com
०९/०९/२०२४
Leave a Reply