काही मराठी आडनावं अशी आहेत की ती आडनावं आहेत यावर विश्वासच बसत नाही. काही व्यक्तीनावंही आडनावं असतात. वसंत, दशरथ, मनोहर वगैरे. माअी हे आदरयुक्त स्त्रीलिंगी टोपण नाव आहे. या नावाचीच ही नवलकथा …..
माझे काका 90 वर्षांचे आहेत. (1976 साल). सलूनमध्ये जाअून केस कापून घेणं ही अलीकडची पध्दत. पूर्वी न्हावी घरी यायचा आणि ज्यांचे केस वाढले असतील त्यांची हजामत करून द्यायचा. अशाच अेका प्रसंगी घडलेली गंमत काका सांगतात.
त्यावेळी कुटुंब मोठं असायाचं. लहान मुलं, मोठी माणसंही बरीच असयची. शिवाय चाळीतल्या किंवा वाड्यातल्या बिर्हाडातील बरीच मंडळी असायची त्यामुळे न्हाव्याला अेका ठिकाणी बरीच कमाअी होत असे.
अेकदा अेका रविवारी, काका त्यांच्या मित्राकडे गेले होते. मित्राचे केस कापून घेणं चाललं होतं. काकांचे केसही वाढले होते.
ते म्हणाले .. चला मीही येथेच माझे केस कापून घेतो.
मित्र म्हणाला … घ्या ना. पण आधी शेजारच्या माअींचे केस कापायचे आहेत. त्यांचं झालं की तुम्ही बसा.
केस कापून घ्यायला माअी येत आहेत हे अैकून काकांना आश्चर्य वाटलं. त्याकाळी विधवांचं केशवपन केलं जाअी. पण ते अेखाद्या आड बाजूच्या खोलीत. माअी ही विधवा बाअी, सर्वांसमोर केस कापून घेणार हे अैकून काका चाटच पडले.
मध्यंतरी अेक गृहस्थ आले आणि केस कापून घेअू लागले. तो पर्यंत काका वर्तमानपत्र वाचीत बसले. थोडा वेळ गेला. काकांचे मित्र आघोळ करून आले. त्या गृहस्थाचे केसही कापून झाले होते.
मित्र म्हणाला … वामनाचार्य, आता तुम्ही बसा.
पण त्या माअींचं व्हायचं आहे ना ? काकांची शंका.
अहो हेच माअी. आमचे नवे शेजारी.
— गजानन वामनाचार्य
अमृत : अेप्रिल १९७६
Leave a Reply