नवीन लेखन...

दररोज दही खाण्याचे फायदे

तुम्हाला सर्वांना हे तर माहीतच आहे कि कुठलेही दूधजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी लाभदायकच असतात त्यातीलच एक आहे दही, दही खाणे हे आरोग्यासाठी नेहमीच हितकारक मानले जाते. दह्यामधील विशिष्ट गुणधर्मामुळे  दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते, तसेच ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅस सारख्या समस्या असतील त्यांच्यासाठी दही एक उत्तम उपाय आहे.

Image result for curd

१) सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांना रात्रीच्या झोपेच्या समस्या उद्भवत आहेत , त्यांच्यासाठी दही हे एक उत्तम खाद्य आहे ज्यामुळे झोपेची समस्या हळू हळू कमी होण्यास मदतच होईल.

२) दह्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर होण्यास मदत होते.

३) दह्यामुळे शरीराची पचनशक्ती सुधारते आणि तसेच  ज्या व्यक्तींना भूक कमी लागते त्यांनी जाणीवपूर्वक दह्याचे नियमित सेवन करावे.

४) दह्यामधील उपलबद्ध असलेल्या कॅल्शियममुळे आपल्या शरीरातील दातांना तसेच हाडांना चांगली  मजबूती मिळते.

५) आपण बऱ्याचदा पाहतो की वजन कमी करायचे असेल तर आपल्याला खूप साऱ्या जाहिराती नजरेस येतात पण ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी दह्यात बदाम, बेदाणे मिसळून खाल्ल्यास वजन वाढण्यास फायदा तर होतोच शिवाय शरीरामध्ये नैसर्गिक ताकदही मिळते.

६) शरीरातील हिटचे प्रमाण वाढल्यास बऱ्याचदा तोंड येते आणि जर असे झाल्यास दह्याचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळा करावा जेणेकरून ते लवकरात लवकर बरे होईल.

— संकेत प्रसादे

 

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..