नवीन लेखन...

लसूण खाण्याचे फायदे

सर्वसाधारणपणे लसणीचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी, किंवा चटणी बनविण्यासाठी केला जातो. एखादी बेचव भाजी केवळ लसूण त्यामध्ये घातल्याने किती चविष्ट बनते ! पण केवळ खाद्यपदार्थांची चव वाढविण्याखेरीज ही लसूण अजून किती तरी प्रकारे उपयोगाला येते. लसणीमध्ये अशी अनेक गुणकारी तत्वे आहेत, ज्यामुळे आपला अनेक विकारांपासून बचाव होऊ शकतो. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्याच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षापूर्वीपासून लसूण औषधी स्वरूपात वापरण्यात येत आहे. जवळपास ५ हजार वर्षापूर्वी लसूण औषधी म्हणून भारतात वापरण्यात येत होता. दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात. साधारणपणे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसूण आर्वजून वापरले जाते. डाळीला, भाजीच्या फोडणीला, चटणीला लसूण वापरले जाते. स्वाद वाढवण्यासाठी लसूण आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर लसणाचे अनेक फायदे देखील आहेत.

1) लसणात अ‍ॅण्टिबॅक्टेरियल गुण आहेत. म्हणूनच तारुण्यपीटिकांची समस्या असल्यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. तारुण्यपीटिकेवर लसणाची पाकळी लावून हलक्याने रगडल्यास लवकरच आराम मिळतो.

2) आयुर्वेदामध्ये लसणीला ‘ वंडर फूड ‘ म्हटले गेले असून, लसणीचा उपयोग औषधी म्हणून केला गेला आहे. त्यामुळे आपण आपल्या आहारात लसणीचा समावेश करणे अगत्याचे आहे. पण या औषधीचा सर्वात जास्त उपयोग सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खाल्ल्याने होतो. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर एक लसणीची पाकळी चावून खावी व त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. जर लसूण चावून खाणे शक्य नसेल, तर लसणीची पाकळी गरम पाण्याबरोबर गिळून टाकावी.

3) लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. अ‍ॅण्टी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.

4) लसूण हृदयरोगाशी संबंधित तक्रारी दूर करण्यास मदत करते. लसूण खाल्ल्याने रक्ताच्या गाठी बनत नाहीत. तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही कमी होते. लसूण आणि मध मिसळून खाल्ल्यास हृदयाच्या धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज दूर होते, त्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहतो. लसूण खाल्ल्याने उच्चरक्तदाब असल्यास तो नियंत्रित ठेवणे शक्य होते. लसणीच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.

5) दिवसभर एका जागी बसून काम करणाऱ्यांनीही लसूण खावा. याशिवाय सतत आळस, झोप, थकवा वाटत असल्यास ते कमी होण्यासाठीही लसणाचा चांगला उपयोग होतो.

6) लसणातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व मिळतात. लसूण उपाशी पोटी खाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. जेवणात दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. नियमित लसूण सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. अ‍ॅसिडीटी आणि गॅसेसच्या त्रासापासूनही दिलासा मिळतो. हृदयाच्या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो.

7) लसणीमध्ये अँटी बॅक्टेरियल व वेदना कमी करणारी तत्वे आहेत. त्यामुळे इन्फेक्शन झाल्याने जर दातदुखी सतावत असेल, तर लसणीची एक पाकळी ठेचून जो दात दुखत असेल, तिथे ठेवावी. या उपायाने दात दुखी कमी होण्यास मदत होते. श्वासनाशी संबंधित विकारांमध्ये ही लसणीच्या सेवनाने फायदा होतो. लसूण नियमित सेवन केल्यास दातांच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो. दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातांवर ठेवावी. लसणात अ‍ॅण्टी बॅक्टेरियल तत्त्व असतता. त्याचा फायदा होतो. सर्दी-पडसे, खोकला, अस्थमा, निमोनिया, ब्रॉन्कायटीस, इत्यादी विकारांमध्ये लसणीचे सेवन फायदेशीर ठरते.

अशाप्रकारे वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असलेल्या अशा ह्या औषधी लसणाचा आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण जरूर उपयोग करून घेतला पाहिजे.

— संकेत रमेश प्रसादे 

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..